Oath ceremony: मंत्री होण्यासाठी मतदान केलेले नाही; नाराज होऊन अधिवेशनातून परतणाऱ्या आमदारांवर मनसेचा घणाघात

58

मंत्रिपदाची संधी ना मिळाल्याने अनेकजण नाराज (denying cabinet) होऊन अधिवेशनाला उपस्थित न राहता मतदारसंघात परतले अशा बातम्या येत आहेत. दरम्यान, रविवार, ०१ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा नागपूर येथे पार पडला. या मंत्रिमंडळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ३९ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यावेळी काही आमदारांना मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होऊन पुन्हा आपल्या मतदार संघात पोहोचले आहेत. यावर मनसेने निशाणा साधला आहे. (Oath ceremony)

आमदार होऊन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यांपैकी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुधीर मुनगंटीवार, अनिल पाटील, तानाजी सावंत, प्रकाश सोळुंके यांच्यासह काही आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अधिवेश सुरु असतानाच छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, प्रकाश सोळुंके, रवी राणा, विजय शिवतारे हे आपपाल्या मतदारसंघात परतले होते. यावरुनच आता मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे (MNS spokesperson Yogesh Khaire) यांनी एक्स पोस्टवरुन नाराज आमदारांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे (MNS spokesperson Yogesh Khaire) यांनी एक्सवर पोस्ट लिहिले आहे की, त्या मतदारसंघातील लोकांनी मंत्री होण्यासाठी मतदान केलेलं नाही. कायदेमंडळात कायदे बनवणे आणि मतदारसंघातील प्रश्न मांडणे यासाठी यांना विधानसभेत (Maharashtra Assembly) पाठवले आहे. मंत्री पद मिळालं नाही म्हणून अधिवेशन सोडून जाणे हा ज्या मतदारांनी त्यांना विधानसभेत पाठवले त्यांच्याशी एक प्रकारचा द्रोह आहे,” असं योगेश खैरे यांनी म्हटलं.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.