ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण असावं की नसावं, यावर मोठी चर्चा सुरू असताना याच मुद्द्यावर आज राज्यात मोठी घडामोड समोर आली आहे. ओबीसी आरक्षण नसल्यास या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज राज्यपालांनी त्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. यासंदर्भातील माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्याने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील हे स्पष्ट झालं आहे.
ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी दिली. #MahaVikasAghadiSarkar #OBCreservation pic.twitter.com/9lojt9QwFJ
— NCP (@NCPspeaks) February 1, 2022
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानेही आज राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांची आज भेट घेतली.
(हेही वाचा – मुंबईतील निर्बंध शिथिल! फेब्रुवारीत प्रशासनाकडून ‘हे’ नवे नियम जारी )
काय म्हणाले अजित पवार
दोन्ही कायदे विभागाचे सचिव आणि आरडीडीचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना राजभवनात पाठवले होते. या अध्यादेशावर राज्यपालांनी सही केली होती, हे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. दोन्ही सभागृहात एकमताने हे विधेयक संमत करण्यात आले आहे. हे विधेयक महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांनी संमत केले आहे, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणतेही मत मांडलेले नाही. ओबीसी घटकही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच एक चांगले वातावरण महाराष्ट्रात रहावे, हीच सगळ्यांची इच्छा होती. आज चार वाजता अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यपालांनी ही स्वाक्षरी केली आहे. राज्यपालांना याबाबत मी धन्यवाद देतो, असेही अजित पवार यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community