आज म्हणजेच शनिवार ३० सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाकडून सुरु असलेलं आंदोलन (OBC Reservation) अखेर आज संपलं आहे. चंद्रपूर येथे गेल्या २१ दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी रवींद्र टांगे यांचे आमरण उपोषण सुरु होते. अखेर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रवींद्र टांगे यांनी आपलं आमरण उपोषण सोडलं आहे.
अधिक माहितीनुसार, चंद्रपूर येथे मागील २१ दिवसांपासून ओबीसी महासंघाचं (OBC Reservation) उपोषण सुरु होतं. मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळू नये यासाठी हे आंदोलन सुरु होता. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंदोलनकार रवींद्र टांगे यांनी लिंबूपाणी घेऊन आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे. काल म्हणजेच शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर बैठक झाली. त्या बैठकीनंतर रवींद्र टांगे यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
🕦10.28am | 30-9-2023 📍 Chandrapur | स. १०.२८ वा. | ३०-९-२०२३ 📍 चंद्रपूर
LIVE | राष्ट्रीय ओबीसी मोर्चा महासंघ अन्नत्याग आंदोलन#OBC #OBCReservation #maharashtra https://t.co/Wxi6X9jPMs
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 30, 2023
(हेही वाचा – Sachin Vaze : खंडणी प्रकरणात सचिन वाझे यांना जामीन)
रवींद्र टांगे (OBC Reservation) यांनी उपोषण सोडल्यानंतर फडणवीसांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही’ असं आश्वासन दिल.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“काल सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी समाजासोबत (OBC Reservation) झालेली संपूर्ण बैठक ही रेकॉर्ड झाली आहे. ही रेकॉर्डिंग राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकार आश्वासन देईल. मात्र, ते पूर्ण करणार नाही, असं होणार नाही. आश्वासन देऊन पूर्ण न करणारे आम्ही नाही. ओबीसी समाजासाठी आम्ही आतापर्यंत २६ जीआर काढले आहेत. ओबीसी समाजातील तरुणांच्या शिक्षणासाठी देखील राज्य सरकारने चांगले निर्णय घेतले आहे. या पुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगले निर्णय घेणार आहोत.”
तसेच पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की; ” ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) कुठेही धक्का लागणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर येणार नाही याची जबाबदारी राज्य सरकार निश्चित घेईल.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community