ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम  

ओबीसी आरक्षणासाठी भाजपने शनिवारी, २६ जून रोजी सकाळपासूनच राज्य स्तरावर चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे. 

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले. त्यानंतरही हा प्रश्न सुटावा म्हणूनही सरकारने काहीही प्रयत्न केले नाही. मात्र आता त्यापुढे जात निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोट निवडणुका जाहीर केल्या. या सर्वांच्या विरोधात भाजपने शनिवारी, २६ जून रोजी सकाळपासूनच राज्य स्तरावर चक्का जाम आंदोलन सुरु केले आहे.


यासंबंधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाची घोषणा केली होती. जर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबतीत भूमिका मांडली असती, तर मात्र हे आंदोलन करण्याची गरज भासली नसती. सरकारने निवडणूक आयोगाला या निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सांगितले नाही. कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, परीक्षा रद्द झाल्या आहेत, मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे नोकर भरती पुढे ढकलण्यात आली आहे. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का स्थगित केल्या जात नाहीत, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.

ठाण्यात प्रवीण दरेकरांना घेतले ताब्यात! 

शनिवारी सकाळीच ठाणे येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केले, त्यावेळी कार्यकर्त्यांनी रस्ते बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी प्रवीण दरेकरांसह भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.

मुलुंड चेकनाक्यावर आशिष शेलारांचे आंदोलन 

मुलुंड चेकनाका येथ भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केले. त्यावेळी भाजपचे खासदार मनोज कोटक हेही उपस्थित होते. यावेळी नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. ओबीसींचे आरक्षण हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. आयोग स्थापन केला नाही, सर्वोच्च न्यायालयाला विश्वासात घेतले नाही. आज काँग्रेसवाले याच मुद्द्यावर आंदोलन करत आहेत, हा चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे आशिष शेलार म्हणाले.

औरंगाबाद येथे गोपीचंद पाडळकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन 

औरंगाबाद येथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा नेतृत्वाखाली भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here