मराठा समाजाची वाताहत ओबीसींनी केली का? (OBC Reservation) मराठा समाजाचा नेमका शत्रू कोण आहे? मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसींचा विरोध नाही. तुम्ही गरीब मराठ्यांवरती अन्याय करण्याचं काम केलं. नात्यात, मुलांना आणि पुतण्याला साखर कारखाने दिले. गरीब मराठा समाजाच्या हातात ऊसाचा कोयता दिला. त्यांची मुलं तुमच्याकडे नोकरी मागण्यासाठी आली, तेव्हा ४० लाख रूपये संस्थाचालकांनी मागितले, अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. (OBC Reservation)
जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली होती. या वेळी पडळकर बोलत होते. या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रासपचे नेते महादेव जानकर आणि ओबीसी नेते उपस्थित होते. (OBC Reservation)
या वेळी पडळकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची सर्वांची आहे. पण, ३४६ जातींचा समावेश असलेल्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही आमची भूमिका आहे. अनेक जातींना ओबीसी आरक्षणाचा लाभ झाला नाही. अनेक जाती ओबीसी आरक्षणापासून वंचित आहेत. अनेक जातींना ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचही होता आलं नाही. आमदार आणि खासदारकी हा लांबचा विषय आहे. (OBC Reservation)
(हेही वाचा – Central Railway : सहा स्थानकांवर ‘या’ तारखेपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद)
या वेळी गोपीचंद पडळकर यांनी छगन भुजबळ यांना पाठिंबा दिला. “ओबीसींवरती अन्याय करण्याची कुणी भूमिका घेत असेल, तर महाराष्ट्र पेटून उठेल. ‘प्रस्थापितांना देऊ उत्तर, कारण ओबीसी शंभरात आहे सत्तर.’ छगन भुजबळांच्या भूमिकेच्या पाठिशी आम्ही सर्वजण उभे आहोत. भुजबळांनी घाबरायचं काम नाही. ५ कोटी धनगर समाज तुमच्या पाठिशी आहे,” असा विश्वास गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केला. (OBC Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community