Dnyanesh Maharao यांच्याकडून श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लील टीका; कोल्हापुरात धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर गुन्हा दाखल

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.

2823

स्वतःला पुरोगामी म्हणवत समाजात मिरवताना ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) कायम हिंदू धर्म, हिंदू देवता, रूढी-परंपरा यांना लक्ष्य करत असतात. चित्रलेखा साप्ताहिक सुरु असेपर्यंत त्यांच्याभवती वलय होते, मात्र हे साप्ताहिक बंद पडल्यानंतर आता महाराव अडगळीत पडलेले आहेत. पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्यांनी हिंदू धर्म आणि देवता यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी त्यांनी जो प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांच्या विरोधात कोल्हापुर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे.

शरद पवार, खासदार शाहू छत्रपतींच्या समोर केली टीका 

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. त्यांच्यासमोर ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) यांनी श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली. ज्ञानेश महाराव यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या क्लिप सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यातील काही क्लिप पाहिल्यावर कोल्हापुरातील अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने यांनी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात जाऊन ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) यांनी आपल्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. महाराव यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९९ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दृष्ट हेतूने कृती करणे.) आणि कलम ३०२ (कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चाराने.) या दोन गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामावर अश्लील टीका करणारे वक्तव्य जसेच्या तसे

ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) म्हणाले, रामाचे मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही, तो एक पत्नी होता, आमुक होता, तमुक होता, काय होता. त्याच्यावर नाटक आलेली ती पहा तुम्ही, त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं, तर मी तो कोण तीचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय, धोब्याचं ऐकतो, बायकोचं बाळंतपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तीचं बाळंतपण होत आणि आपण त्याला देव मानतो, आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे, त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले, पाच शो ‘भुमीकन्या सीता’ नावाचे, ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे, लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे, ती त्या रामाला विचारते, तु स्वतःला इतका मोठा समजतो. राजा समजतो, देव समजतो अजुन कोण काय समजतो? तुझ्याबरोबर तुझा भाऊ आला तुझी बायको आली, एक वर्ष ती अशोक वनामध्ये होती, म्हणून तिच्यावरती तु संशय घेतलास, तु तुझ्या भावाला विचारलस काय? कि 14 वर्षे तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल, ती सांगते अग्निपरिक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेवू नको, माझी शुध्दता बघ, म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल. त्या नाटकाचे पाचच शो झाले, नंतर नाही झाले. हे इकडची संस्कृती सांगते.’

स्वामी समर्थ यांच्यावर टिकणारे वक्तव्य जसेच्या तसे 

ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) म्हणाले, संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी बिमी जोरात चालू आहे, रोज काय ते तो कमी कपड्यात माणुस दिसतो, आपला नवरा, आपला मुलगा असा फिरला घरात तर चालेल काय संध्याकाळच्या वेळेला, पण आपल्याला वाटत स्वामीनी सगळी स्वामींची कृपा, मग 50 वर्षे शरद पवारांनी राजकारण केलय काय ते असच केलं? काय योजना बिजना राबवल्या नाहीत, शाळा उभ्या केल्या नाहीत, कर्जासाठी बँका नाही निर्माण केल्या, काय केलं काय मग, जे करेल ते स्वामी करेल, कोण टिव्हीवरनं सांगते कोण नटी आहे अशोक सराफची बायको की, इमारतीवरून उडी टाकली तरी स्वामी वाचवतील, मग हिलाच ऑलिम्पिकमध्ये पाठवले पाहिजे होत ना उड्या मारायला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.