ओडिशा आणि त्रिपुराला नवीन राज्यपाल (Governor Appointed) मिळाले आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर इंद्रा सेना रेड्डी नल्लू यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
त्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या नियुक्त्या करताना आनंद होत आहे. दास आणि नल्लू (Governor Appointed) आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील त्या तारखेपासून या दोन्ही पदांवरील नियुक्त्या लागू होतील.
याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी ट्विट केले की, ‘रघुवर दास जी यांचे ओडिशाचे राज्यपाल (Governor Appointed) म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन.”
कोण आहेत रघुवर दास?
रघुवर दास (Governor Appointed) हे सध्या भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. २०१४ ते २०१९ या काळात ते झारखंडचे मुख्यमंत्री होते. झारखंडच्या स्थापनेनंतर आपला कार्यकाळ पूर्ण करणारे दास हे पहिले मुख्यमंत्री होते.
रघुवर दास जी को उड़ीसा का राज्यपाल बनने पर बधाई@dasraghubar pic.twitter.com/Moyp8ZZk3y
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) October 18, 2023
दास १९९५ मध्ये पहिल्यांदा जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून आमदार झाले. त्यांनी झारखंडचे उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. तर इंद्रा सेना रेड्डी नल्लू हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. (Governor Appointed)
तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाची म्हणजेच भाजपची सत्ता आहे. (Governor Appointed)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community