EXIT POLL : ओडिशामध्ये BJP चाच बोलबाला

172
एक्झिट पोलनुसार (EXIT POLL) ओडिशात भाजपा मोठी मुसंडी मारताना दिसत आहे.13 मे ते 1 जून या कालावधीत ओडिशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी चार टप्प्यात पार पडल्या. राज्यात लोकसभेच्या 21 जागा होत्या. येथे तिरंगी लढत होण्याची अपेक्षा होती, परंतु एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर, भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलनुसार, भाजपला ओडिशातील लोकसभेच्या 18-20 जागा मिळू शकतात, तर बीजेडीला 2 आणि इंडिया आघाडीला 1 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच इथे विधानसभेच्या निवडणुकादेखील पार पडल्या. विशेष म्हणजे, गेल्या दोन दशकांहून अधिक काळपासून बीजेडीचा बालेकिल्ला असलेल्या ओडिशात यंदा भाजपा मोठी मुसंडी मारताना दिसत आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. सर्वेक्षणानुसार बीजेडी आणि भाजप या दोन्ही पक्षांना 62 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेसला 5-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. ओडिशा विधानसभेत बहुमताचा आकडा 74 जागा आहे. मतांच्या टक्केवारीबाबत झाल्यास, भाजपा आणि बीजेडीला 42% मते मिळाली आहेत. या आकडेवारीवरुन बीजेडीला एकहाती सत्ता मिळवता येणार नसल्याचे सिद्ध होत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.