नवनीत राणांविरुद्ध FB वर आक्षेपार्ह पोस्ट करणं तरूणाच्या अंगाशी, विनयभंगाच्या कलमासह गंभीर गुन्हे दाखल

133

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरूद्ध बडनेरा येथील मंगेश चव्हाण या युवकाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली. ही आक्षेपार्ह पोस्ट करणं तरूणाच्या चांगलंच अंगाशी आले आहे. याप्रकरणी नवनीत राणांच्या समर्थकाने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बडनेरा पोलिसांनी नवनीत राणांची बदनामी केल्याप्रकरणी, आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी, महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा संबंधित युवकाविरोधात नोंदविला आहे. तसेच महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल, अशी पोस्ट केल्याने युवकाविरूद्ध पोलिसांनी विनयभंगाच्या कलमासह गंभीर गुन्हे दाखल केले आहे.

(हेही वाचा – MSRTC: सवलतधारकांची ‘लालपरी’कडे पाठ! तब्बल १,३०० कोटींचे नुकसान)

नवनीत राणा यांनी युवा सेनेचे नेते व आमदार आदित्य ठाकरेंच्या विरूद्ध विधान केले होते. त्याला उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या समर्थकाने नवनीत राणांच्या विरोधात पोस्ट टाकली. त्यात ही पोस्ट आक्षेपार्ह असल्याने तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ठाकरे घराणे आणि राणा घराणे यांचा राजकारणात छत्तीसचा आकडा आहे. ठाकरे आणि राणा दाम्पत्य एकमेकांवर आरोप करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अशातच राणांविरोधात सोशल मीडियावर बदनामी करणं या तरूणाला चांगलेच भोवले आहे. त्यामुळे तुम्ही देखील सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट व्हायरल करत असाल तर पोस्ट व्हायरल  करताना भान ठेवणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.