Sharad Pawar : शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा

200

बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर तालुक्यात शनिवार, ९ मार्च रोजी महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. या सभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे याच पुन्हा या मतदारसंघातून मविआच्या उमेदवार असतील, अशी घोषणा केली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भोरच्या थोपटे कुटुंबियांसोबत असलेल्या सुप्त संघर्षालाही पवार यांनी पूर्णविराम दिला. सभा सुरू होण्याआधी शरद पवार यांनी भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर जाहीर सभेत अनंत थोपटे यांचे पुत्र आणि भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना भविष्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठी संधी देण्याचे आश्वासनही अप्रत्यक्षरित्या दिले आहे.

(हेही वाचा Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील ‘हे’ दोन पक्ष NDA सोबत; भाजपाची ताकद वाढली)

सत्ता आली तर… 

प्रचारसभेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, संग्राम थोपटे यांच्या हाती तुम्ही या भागाचे नेतृत्व दिले आहे. तुमचे जे काही दुखणे असेल ते दूर करण्याची जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर टाकली आहे. आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की, संग्राम थोपटे….तुम्ही जे काही या तालुक्यासाठी कराल, जिल्ह्यासाठी कराल, राज्यासाठी कराल त्यामध्ये हा शरद पवार (Sharad Pawar) तुमच्या पाठीशी कायम राहील. यापूर्वी आपले रस्ते वेगळे होते. मात्र इथून पुढे आता शरद पवारांचा पाठिंबा असल्यानंतर विकासाबाबत, राजकारणाबाबत काय परिवर्तन होऊ शकते हे दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी संग्राम थोपटे यांना भविष्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.