सरकार ठाकरेंचे अधिकारी विरोधकांचे

144

सुशांत सावंत

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ५ पोलीस अधिकारी प्रयत्न करत होते, या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वक्तव्याने उडालेला धुराळा शांत बसत नाही तोच सरकारमधील शिवसेनेच्या एक मंत्र्याने हि वस्तुस्थिती असून सरकार ठाकरेंचे मात्र अधिकारी फडणवीसांचे आहेत, असे म्हणाले.

एका शिवसेनेच्या मंत्र्याने ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले कि, शासनामधील काही अधिकारी सरकारला अडचणीत आणण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात. त्यांच्यामुळे अनेकदा मंत्रिमंडळ बैठकीत वाद होत असतात. इतकेच नाही तर सरकारच पडावे याकरता हे अधिकारी अजूनही कार्यरत आहेत.

 

‘त्या’ शपथविधीतही अधिकाऱ्यांचा हात

राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा जो पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला, त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले’ असा खुलासा देखील शिवसेनेकडून करण्यात आला आहे. काही अधिकारी आजही उच्चपदी विराजमान आहेत. ठाकरे सरकार येऊ नये म्हणून उघड प्रयत्न करूनही आपले कोणी काय वाकडे केले या थाटात ते वावरत असतात. सरकारला धोका असतो तो याच प्रवृत्तीपासून. सरकार पाडणे म्हणजे काय असते? सरकारसंदर्भातले काही विषय गुप्तपणे विरोधकांकडे पोहोचवणे व सरकारच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणेत अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. अशा प्रवृत्तींवर निगराणी ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी चोख पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.