बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनात लावणार; विधानसभा अध्यक्षांची घोषणा

188

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावणार असल्याची घोषणा मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान भवन मुंबईच्या मध्यवर्ती सभागृहात हे तैलचित्र लावले जाईल.

( हेही वाचा : १०० व्या कसोटी सामन्यात २०० धावा! सचिनशी बरोबरी करत वॉर्नरने केले अनेक रेकॉर्ड)

नार्वेकर म्हणाले, मला सर्व सदस्यांना हे सूचित करताना अतिशय आनंद होत आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र आपण विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात बसवित आहोत . या तैलचित्राचा अनावरण सोहळा बाळासाहेब ठाकरे यांच्या येत्या जयंतीदिनी, २३ जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता विधानभवनाया मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सर्व सदस्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे, अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो.

ऑगस्ट २०२२ मध्ये पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असे तैलचित्र बसविण्याबाबत माझ्याकडे निवेदन केले होते. त्यानुषंगाने याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे मी या सभागृहाला आश्वासित केले होते. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात समारंभपूर्वक झळकणार आहे, असेही अध्यक्ष नार्वेकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.