गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर १९ सप्टेंबर या दिवशी नवीन संसदेच्या वास्तूत कामकाज चालू करण्यात येणार आहे. (Constitution House) तत्पूर्वी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉल मध्ये विशेष सत्र भरवण्यात आले. या निरोप समारंभामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संसद भावनाद्वारे झालेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. ‘ही इमारत, हा सेंट्रल हॉल एकप्रकारे आपल्या भावनांनी भरलेला आहे. आज जगातील प्रत्येकाला भारताला मित्र बनवायचे आहे. आपण विश्व मित्राप्रमाणे पुढे जात आहोत. छोट्या कॅनव्हासवर मोठे चित्र काढता येत नाही. भव्य भारतासाठी विचारांची व्याप्ती वाढवावी लागेल. नवा भारत घडवणे ही काळाची गरज आहे. आता आपण नव्या संसदेत प्रवेश करणार आहोत. तेव्हा जुन्या संसदेला फक्त जुनी संसद म्हणू नये. जुन्या संसदेला ‘संविधान भवन’ म्हणून ओळखले जावे, असे माझे आवाहन आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या वेळी भाजपच्या खासदार मनेका गांधी आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. अत्यंत भावूक वातावरणात जुन्या संसद भवनाला निरोप देण्यात आला. (Constitution House)
(हेही वाचा – Women’s Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता; वाचा काय म्हणाल्या सोनिया गांधी… )
सेंट्रल हॉल इतिहासाचा साक्षीदार
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे आपल्याला भावनिक बनवते आणि कर्तव्यासाठी प्रेरित करते. (Constitution House) स्वातंत्र्यापूर्वी हा विभाग एक प्रकारची लायब्ररी म्हणून वापरला जात होता. नंतर संविधान सभेची बैठक सुरू झाली आणि त्यानंतर येथे आपले संविधान आकाराला आले. येथेच 1947 मध्ये ब्रिटिश सरकारने सत्ता हस्तांतरित केली. हे सभागृह त्या प्रक्रियेचे साक्षीदार आहे. सेंट्रल हॉलमध्ये तिरंगा आणि राष्ट्रगीत स्वीकारण्यात आले. अनेक प्रसंगी दोन्ही सभागृहांनी भारताच्या भवितव्याबाबत निर्णय घेतले. आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेने मिळून 4 हजारांहून अधिक कायदे केले आहेत. आम्ही सर्व भाग्यवान आहोत की, आम्हाला कलम 370 मधून सभागृहात स्वातंत्र्य मिळवण्याची संधी मिळाली. अशा अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये संसदेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
याच संसदेत मुस्लिम भगिनी-मुलींना न्याय मिळण्याची प्रतीक्षा शाहबानो प्रकरणामुळे काहीशी उलटली. आमची ती चूक या सभागृहाने सुधारली. एकामागून एक घटना पाहिल्या, तर आज भारत नव्या चेतनेने जागृत झाला आहे. भारत नवीन ऊर्जेने भरलेला आहे. ही जाणीव, ही ऊर्जा या देशातील कोट्यवधी लोकांना त्यांच्या दृढनिश्चयाने यशाकडे नेऊ शकते. इच्छित परिणाम साध्य होतील. जितक्या वेगाने आपण कार्य करू तितक्या वेगाने आपल्याला परिणाम मिळतील.” (Constitution House)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community