Old Pension Scheme : अजित पवारांनी केली काँग्रेसची पोलखोल; जुनी पेन्शन बंद करण्याचा निर्णय काँग्रेसचाच

226
Old Pension Scheme : अजित पवारांनी केली काँग्रेसची पोलखोल; जुनी पेन्शन बंद करण्याचा निर्णय काँग्रेसचाच

राज्याचे अर्थ मंत्री अजित पवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेवरून विधानसभेत काँग्रेसची पोलखोल केली. जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा देशपातळीवरील निर्णय काँग्रेस सरकारचा होता याची आठवण करून देत, ‘जुनी पेन्शन लागू केल्यास राज्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांचे केवळ पगार आणि पेन्शन एवढेच देणे शक्य होईल, बाकी काहीही देता येणार नाही,’ या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या व्यक्तव्याची आठवण काँग्रेस नेत्यांना करून दिली आणि त्यानंतर या विषयावर काँग्रेसकडून एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. (Old Pension Scheme)

काँग्रेसचा सवाल

सोमवारी १ जुलैला काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात अर्थ मंत्री अजित पवार यांना अडचणीत आणणारा प्रश्न केला. “१ नोव्हेंबेर २००५ पूर्वी जाहिराती निघालेल्या व त्यानंतर शासन सेवेत रूजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय शासनाद्वारे नुकताच घेण्यात आला आहे, या प्रशाचे उत्तर ‘होय’ असे दिले आहे. तर या निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून करणार?” असा सवाल थोरात यांनी केला. (Old Pension Scheme)

योजना सर्वसहमतीने

त्यावर पवार म्हणाले, “कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आणि ती बॅच २०३० ला निवृत्त होणार आहे. बाळसाहेब, तुम्ही तर इतके ज्येष्ठ आहात, तुम्हाला काय सांगणार?” तसेच अधिक माहिती देताना पवार यांनी स्पष्ट केले की, सरकारने स्थापन केलेल्या निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांच्या एका समितीच्या शिफारशीवरून पेन्शन योजना सुरू करण्यात आली. त्याला सगळ्यांनी, म्हणजेच कर्मचारी संघटनांनी, त्यांच्या नेत्यांनी मान्यता दिली. यात कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के आणि शासकीय १४ टक्के वाटा बाजूला काढण्याची योजना आहे. या योजनेत ती रक्कम कालांतराने वाढत जाईल. (Old Pension Scheme)

(हेही वाचा – Mumbai Crime: झोपेत चालणं जीवावर बेतलं; सहाव्या मजल्यावरुन कोसळला आणि मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!)

थोरात मंत्रीपदी असताना पेन्शन बंदीचा निर्णय

यावर थोरात यांनी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी अजूनही आंदोलने सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि सर्वसहमती कशी? असा सवाल केला. त्यावर पवार यांनी थोरात आणि काँग्रेसचे राजकारण उघडे पाडले. केंद्रात डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधान आणि विलासराव देशमुख राज्यात मुख्यमंत्री असताना देशपातळीवर जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय झाला, तेव्हा बाळासाहेब थोरात राज्यात मंत्रीपदी होते आणि त्यांनीही या निर्णयाला मान्यता दिली होती, यांची आठवण करून दिली. तसेच सध्याचे महायुती पेन्शन योजनेबाबत सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांगितले. (Old Pension Scheme)

फेक नरेटीव्ह खटाखट..

भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी काँग्रेसचा समाचार घेत “फेक नरेटीव्ह आणि खोटं बोलण्याचं मोठं पेव आले आहे. त्यामुळे खटाखट, खटाखट, खटाखट, खटाखट काही फटाफट येत नाही,” असा टोमणा हाणाला. “२००५ चे हे असेच प्रकरण आहे. निर्णय करणार हे, आंदोलन करणार हे, खोटं बोलायला लावणार हेच, खोटं आश्वासन देणार हेच आणि खोटं बोलून मते घेणार हेच,” अशी टीका शेलार यांनी केली. (Old Pension Scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.