- प्रतिनिधी
इंडी आघाडीची कोणतीही बैठक होत नाही, नेतृत्व देखील नाही इंडी आघाडी फक्त नावापुरती उरली असल्याची गंभीर टीका जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी केली आहे. हे टिकास्त्र काँग्रेससाठी चांगलीच चपराक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात काँग्रेस सोबतच इंडी आघाडीच्या अस्तित्वाविषयी जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.
(हेही वाचा – Aditya Thackeray यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; मांडल्या विविध मागण्या)
अब्दुल्ला (Omar Abdullah) म्हणाले की, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इंडी आघाडीची एकही बैठक बोलावली जात नाही. त्यामुळे याविषयी, ना नेतृत्वाबाबत, ना अजेंडाबाबत आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहू की नाही, याबाबत स्पष्टता नाही. इंडी आघाडीतील घटक पक्ष आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस यांनी दिल्लीत स्वतंत्र निवडणूक लढविल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात आहेत. यावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमचा दिल्ली निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असे मुख्यमंत्री अमर अब्दुल्ला म्हणाले.
(हेही वाचा – Sovereign Gold Scheme : केंद्र सरकार सोव्हरिन गोल्ड फंड बंद करणार? सध्याच्या गुंतवणूकदारांचं काय होणार?)
दिल्लीत भाजपाविरोधात लढणाऱ्या पक्षांना सल्ला देताना मुख्यमंत्री अब्दुल्ला (Omar Abdullah) म्हणाले की, भाजपाचा मुकाबला अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल, हे आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि तेथील रिंगणात असलेल्या पक्षांनी ठरवले पाहिजे. याआधी सलग दोन निवडणुकांमध्ये ‘आप’ला यश मिळाले होते. यावेळी दिल्लीतील जनता काय निर्णय घेते हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राजदच्या एका नेत्याने म्हटले आहे की, इंडी आघाडीची युती लोकसभेसाठी होती. ज्याला उत्तर देताना ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) म्हणाले की, मला आठवते, यावर कोणतीही वेळ मर्यादा घालण्यात आलेली नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आघाडीची एकही बैठक बोलावली जात नाही. त्यामुळे याविषयी, ना नेतृत्वाबाबत, ना अजेंडाबाबत आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहू की नाही, याबाबत स्पष्टता नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community