Delhi Assembly Election Result 2025 : दिल्लीत आप, काँग्रेसचा सुपडा साफ ; इंडी आघाडीला अब्दुल्ला म्हणाले, “और लढो आपस में”

143
Delhi Assembly Election Result 2025 : दिल्लीत आप, काँग्रेसचा सुपडा साफ ; इंडी आघाडीला अब्दुल्ला म्हणाले,
Delhi Assembly Election Result 2025 : दिल्लीत आप, काँग्रेसचा सुपडा साफ ; इंडी आघाडीला अब्दुल्ला म्हणाले, "और लढो आपस में"

दिल्ली (Delhi) विधानसभा निवडणुकीचे निकाल (Delhi Assembly Election Result 2025) जाहीर होत आहेत. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. (Delhi Assembly Election Result 2025)

हेही वाचा-Delhi च्या ‘या’ मतदारसंघात विजय मिळवणारा पक्षच करतो सरकार स्थापन

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आकडेवाडीनुसार, 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपाचं कमळ फुलणार आहे. मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदा भाजपकडे जात आहे. तर, काँग्रेसची (Congress) कामगिरी पुन्हा निराशाजनक दिसत असून अवघ्या एका जागेवर आघाडीवर आहे. (Delhi Assembly Election Result 2025)

हेही वाचा- Delhi Election Result 2025 प्राथमिक कल समोर; कोण आघाडीवर ?

पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता राहणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मात्र आता भाजपा (BJP) ४८ जागांवर आघाडीवर आहे. तर दिल्लीत आप, काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षाला (Aap) मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. कारण, ‘आप’चे प्रमुख उमेदवार पिछाडीवर आहेत. यामध्ये अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे. नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. (Delhi Assembly Election Result 2025)

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे ट्विट
दिल्ली (Delhi) विधानसभा निवडणुक निकालांच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah ) यांनी ट्विट केले आहे. ‘और लढो आपस में’ असे म्हणत अब्दुल्ला यांनी इंडी आघाडीला टोला लगावला आहे. (Delhi Assembly Election Result 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.