कार्तिकी एकादशीला पंढरपुरी विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. मात्र, राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री कार्यरत असल्यामुळे त्यातील कोणाला हा मान द्यायचा, असा पेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे त्यांनी विधी आणि न्याय विभागाकडे याबाबत सल्ला मागितला आहे. (DCM Of Maharashtra)
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी दाम्पत्य यांच्या हस्ते करण्याची प्रथा आहे. यात्रेच्या तयारीसाठी नुकतीच मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांना महापूजेचे निमंत्रण देण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, दोन उपमुख्यमंत्री असल्याने निमंत्रण कुणाला द्यायचे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कार्तिकी एकादशीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांना बोलवावे लागणार आहे. गेल्यावेळची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. यंदा एकाला बोलावल्यास दुसऱ्याची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्याचे ठरविण्यात आले आहे. (DCM Of Maharashtra)
(हेही वाचा – Newsclick : न्यूजक्लिकचा भारताच्या नकाशाच्या विकृतीकरणाचा अजेंडा; प्रबीर पुरकायस्थ यांच्या विरोधात काय आहेत पुरावे)
२३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. केवळ दीड महिन्यांचा काळ शिल्लक राहिल्याने लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांनी विधी व न्याय विभागाचा सल्ला मागितला आहे. या विभागाकडून जे नाव सुचवले जाईल, त्यांना शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात येणार आहे. दरम्यान, विधी आणि न्याय खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने शासकीय महापूजेसाठी फडणवीस यांचेच नाव निश्चित केले जाईल, अशी माहिती प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (DCM Of Maharashtra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community