शरद पवारांना थप्पड लगावणारा तब्बल 8 वर्षे होता फरार

90

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणा-या अभिनेत्री केतकी चितळेवरुन महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आता शरद पवारांना कानशिलात लगावल्याचा 2011 चा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

10 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

10 वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शरद पवार हे युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्री होते, त्यावेळचा त्यांचा हा व्हिडिओ आहे. 24 नोव्हेंबर 2011ला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना नवी दिल्ली महानगरपालिका केंद्रात एका तरुणाने थप्पड लगावली. दिल्लीत एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतल्यावर ते बाहेर जात असताना, हरविंदरसिंग नावाच्या तरुणाने त्यांना थप्पड लगावली होती.

New Project 2022 05 19T192114.612

…म्हणून लगावली कानशिलात

कृषिधोरणांमधला नाकर्तेपणा आणि उदासीनता तसेच, सरकारचे नियंत्रण नसल्याच्या रागातून ही कृती केल्याचे हरविंदरसिंगने माध्यमांना सांगितले होते. हरविंदरसिंग याला 2019 मध्ये तब्बल 8 वर्षांनंतर अटक करण्यात आली होती. ही घटना घडली होती, तेव्हाच त्याला ताब्यात घेण्यात आले होते, पण खटल्यादरम्यान, 2014 मध्ये त्याला दिल्ली न्यायालयाने फरार घोषित केले होते.

2014 मध्ये केले फरार घोषित

तब्बल 8 वर्षांनंतर या महाभागाला अटक करण्यात यश आल्याने दिल्ली पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. शरद पवारांना कानशिलात लगावल्यानंतर, हरविंदर याला अटक करण्यात आली होती. पण अटक केल्यानंतर, तो कोठडीतून पळाला होता. शोधूनही न सापडल्याने त्याला 2014 मध्ये फरार घोषित करण्यात आले होते. शरद पवारांच्या कानशिलात लगावल्याने, संसद मार्गावरील ऑडिटोरियमच्या सुरक्षा कर्मचा-यांनी हरविंदरला पकडले होते आणि पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हरविंदर हा एक वाहतूकदार होता.

( हेही वाचा :‘आधी लगीन कोंढाण्याचे, नंतर रायबाचे’ त्या रायबाचे पुढे काय झाले ? )

…अखेर हरविंदर गजाआड

हरविंदर पोलिसांच्या तावडीतून निसटल्याने, त्याचा शोध सुरु झाला, मात्र हरविंदर नेमका कुठे आहे याचा ठावठिकाणा लागत नव्हता. सातत्याने त्याचा शोध पोलिसांनी सुरु ठेवला आणि अखेर 8 वर्षांनंतर म्हणजे 2019 मध्ये पोलिसांना खबरींकडून हरविंदरबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी अखेर हरविंदर याला बेड्या ठोकल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.