Veer Savarkar : सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न 

115

स्वातंत्र्यवीर सावरकर फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या (Veer Savarkar) जयंतीनिमित्त आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत आज रक्तदान शिबिर भरवण्यात आले. यामध्ये  51 जणांनी रक्तदान केल्याची माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे सचिव मेघश्याम देशपांडे यांनी दिली.

savarkar 11

यावेळी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर, भाजपचे शहराध्यक्ष धिरज घाटे भाजप व्यापारी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र व्यास, भाजप महिला शहराध्यक्ष हर्षदा फरांदे, महिला सरचिटणीस प्रियंका शेडगे – शिंदे, सरचिटणीस व्यापारी आघाडी नयन ठाकूर, भाजप कसबा विधानसभा ओबीसी अध्यक्ष देवेंद्र वडके, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, माजी नगरसेवक महेश वाबळे,  अमित कंक सरचिटणीस कसबा मतदारसंघ, राजू दादा परदेशी सरचिटणीस कसबा मतदारसंघ आदी यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा ‘मनुस्मृती’चे दहन केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवा; Jitendra Awhad यांच्या वक्तव्यानंतर हिंदु जनजागृती समितीची मागणी)

उपक्रमांबद्दल बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रितम थोरवे म्हणाले,  स्वातंत्र्यवीर सावरकर फाऊंडेशनच्या वतीने यंदा प्रथमच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) जयंती महोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आम्ही तीन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून आजचे  रक्तदान शिबीर भरवण्यात आले होते, आमच्या सर्व उपक्रमांना आणि गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल येथे होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाल्याचे थोरवे यांनी नमूद केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.