-
खास प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना ऊबाठा आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शपथ घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) सभागृहात उपस्थित नव्हते, यामुळे विधान भवन परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली.
पहिल्या क्रमांकावर नाना
शनिवारी अधिवेशाच्या पहिल्या दिवशी १७३ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला तर रविवारी सकाळी ११ वाजता उर्वरित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. पहिल्याच क्रमांकावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव पुकारले गेले आणि त्यांच्यापासून शपथविधीला सुरुवात झाली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर अन्य काही आमदारांनी शपथ घेतली. बहुतांश आमदार शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट घेत आणि त्यांना अभिवादन करत.
(हेही वाचा – जम्मूत Rohingya आणि बांगलादेशी घुसखोरांची वीज, पाणी कनेक्शन तोडले; ओमर अब्दुल्ला सरकार झाले नाराज)
मुद्दाम गैरहजर?
पटोले यांच्यापाठोपाठ १३-१४ आमदारांनंतर शिवसेना ऊबाठा आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव पुकारले गेले आणि त्यांनी शपथ घेतली. ठाकरे यांनी शपथ घेतली तेव्हा सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री शिंदे, पवार हे उपस्थित नव्हते. त्यामुळे हे प्रमुख नेते मुद्दाम सभागृहात गैरहजर राहिल्याची चर्चा सुरू झाली.
विधानसभा अध्यक्षीय निवडणूक
अधिक माहिती घेतली असता समजले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांचा अर्ज दाखल करण्याच्या कामी व्यस्त असल्याने ते सभागृहात उपस्थित राहू शकले नाही, असे सांगण्यात आले. विधसनसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या दालनात नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज ११.२० वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आला, त्यावेळी यांच्यासोबत फडणवीस, शिंदे आणि पवार आवर्जून उपस्थित होते. तर विरोधी पक्षातर्फे एकही अर्ज आला नाही. त्यामुळे नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, हे जवळपास निश्चित झाले.
आठ आमदार राहिले मागे
शनिवारी आणि रविवारी अधिवेशन काळात एकूण २८८ आमदारांपैकी २७९ आमदारांनी शपथ घेतली तर आठ आमदारांचा शपथविधी घेणे बाकी आहे. त्यातील काही सोमवारी ९ डिसेंबर २०२४ या दिवशी सभागृहात शपथ घेतील अन्यथा नव्या अध्यक्षांच्या दालनात शपथ दिली जाईल, अशी माहिती भोळे यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community