गणेश दर्शनाच्यानिमित्ताने राजकारण्यांची संपर्क मोहीम जोरात

127

मुंबई पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होण्याआधीच राजकीय वातावरण तापू लागले असताना, गणेश दर्शनाचे निमित्त साधत सर्वच राजकीय पक्षांनी व्यापक संपर्क मोहीम हाती घेतल्याचे पहायला मिळत आहेत.

( हेही वाचा : अनंत चतुर्दशीला मुंबई सेंट्रल – चर्चगेट दरम्यान लोकल गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार )

शिंदे गट आणि भाजप यात आघाडीवर आहे. मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह याचा निवडा बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्याने शिंदे गटातील भरतीला काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. ते बदलण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. गेल्या आठ दिवसांत त्यांनी सार्वजनिक आणि घरगुती मिळून जवळपास ३०० हून अधिक गणपतींचे दर्शन घेतले. मुंबई आणि ठाण्यावर त्यांचा विशेष जोर असून, उद्धव सेनेतील आजी-माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन ते पक्ष बांधणी करीत असल्याचे पहायला मिळत आहे.

फडणवीसांचा नागपूर, पुण्यावर भर

देवेंद्र फडणवीस यांनीही यंदा गणेश मंडळांकरिता विशेष वेळ राखून ठेवला असून, त्यांचा नागपूर, पुण्यावर भर दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससही यात मागे नाहीत. एकूणात, मतदारांशी थेट संवाद साधतानाच, कार्यकर्त्यांशी भेटीगाठींचा सपाटा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी लावला लावल्याचे पहायला मिळत आहे.

नेत्यांचीही दमछाक

गणेश मंडळांची आरती करणे, मंडळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावणे, प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाणे, जास्त संख्येने नागरिक उपस्थित असलेल्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणे अशा प्रकारचे कार्यक्रम नेतेमंडळींकडून प्राधान्याने सुरू आहेत. वेळ कमी, परिसर मोठा आणि भेटू इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने नेत्यांचीही दमछाक होताना दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.