एकच लक्ष्य मोदी सरकार विरोधात एक कोटी साक्ष! काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

युवक काँग्रेसने राज्यस्तरीय स्वाक्षरी मोहीम केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात याची सुरुवात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते झाली.

67

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ११ जुलै ते १५ जुलैपर्यंत राज्यव्यापी स्वरूपात नागरिकांची सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. दैनंदिन स्वरूपात आपल्या उपजीविकेत व्यस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासाबाबत व उद्रेकाबाबत नागरिकांच्या भावनांना आवाज मिळवून देण्यासाठी युवक काँग्रेसने राज्यस्तरीय स्वरूपात या मोहिमेस सुरूवात केली आहे. या मोहिमेचा पिंपरी-चिंचवड शहरातील शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. पिंपरी चौकाजवळील एचपी पंपावर ह्या मोहिमेचा आरंभ करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहरात विविध ठिकाणी नागरिकांशी संपर्क साधून महागाई विरोधातील या आंदोलनात नागरिकांच्या सहाभागासाठी सह्या घेऊन पाठिंबा घेण्यात येणार आहे. या मोहिमेस नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांचा स्वयं सहभाग या मोहिमेचे महत्व दर्शवत होता. या प्रसंगी काही नागरिकांनी स्वत: पुढे येऊन पदाधिका-यांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.

 (हेही वाचा : लोक बेरोजगार झाले, पण मोदींना विश्वगुरू व्हायचं आहे! मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप)

मोदी सरकारला सळो की पळो करून सोडा – सत्यजीत तांबे

या प्रसंगी बोलताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले असताना मोदी सरकारकडून सातत्याने दरवाढ केली जात आहे. या देशातील मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या नावाखाली जनतेची लूट करत आहे. ४० रुपयांच्या पेट्रोलला १०५ रूपयाचा भाव, ४०० रूपयाच्या गॅस टाकीला ८५० चा भाव, तर ५० रूपयाच्या डिझेलला जवळपास १०० रूपयाचा भाव झाला आहे अशा प्रकारे गोरगरीब जनतेच्या संसारावर घाला घालण्याचे काम भाजपाचे मोदी सरकार करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने “एकच लक्ष मोदी सरकार विरोधात एक कोटी साक्ष” अशा एक कोटी सह्या गोळा करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे व ही मोहीम यशस्वीपणे सुरू आहे., असे तांबे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.