महाविकास आघाडी हे सरकार तीन पक्षांचं आहे. पण, या सरकारमध्ये ब-याचदा शिवसैनिक खूश नसल्याचं दिसून आलं आहे. तसेच, अनेकदा या तीन पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोड्या करताना दिसतात. आता असेच एक वक्तव्य शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे, म्हणून हे सगळ सहन करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकार शिवसैनिकांचा वापर करत आसल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ‘आम्ही आहोत, म्हणून सत्ता आहे’, असं म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
म्हणून सगळ सहन करतोय
हेमंत पाटील पुढे म्हणाले की, 100 टक्के शिवसैनिकांचं नुकसान होत आहे, शिवसैनिकांचा वापर केला जातं आहे. वरिष्ठांच्या कानावर वारंवार या गोष्टी घातल्या आहेत. खरं तर हे जाहीरपणे बोलण्याची गरज नाही. मी शिवसेनेचा एक निष्ठावान शिवसैनिक आहे, म्हणून उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे आम्ही हे शांतपणे सहन करतोय. असे स्पष्ट वक्तव्य हेमंत पाटील यांनी केले आहे.
महाविकास आघाडी विरोधात सेनेत वाढतेय नाराजी
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी याआधी महाआघाडीमुळे सेनेचे नुकसान होत आहे असे लिखित स्वरुपात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवले होते. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा घात करण्यात आला, असा आरोप शिवसेनेचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेनेचा मतदार संघ गिळंकृत करत आहे असा गंभीर आरोप करुन, चोविस तास उलटत नाहीत तोच आता शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी महाआघाडी बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या महाविकास आघाडीमुळे शिवसेनेतील बरेच नेते असमाधानी आहेत, त्यातील काही जण उघडपणे भाष्य करू लागले आहेत.
( हेही वाचा: अरे देवा, आता लोकलमध्येही नमाज पठण )
Join Our WhatsApp Community