महाविकास आघाडीतील घोटाळेबाज मंत्री आणि आमदार यांची ११ जणांची यादी बनवून खळबळ उडून देणारे भाजपा नेते डॉ. किरीट सोमय्या यांच्या रडारवर सरकारमधील आणखी २ मंत्री रडारवर आले आहेत. त्यातील एक शिवसेनेचा आणि एक एनसीपीचा आहे, त्यांची पोलखोल सोमवारी करणार आहे, असा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला.
आधी शिवसेना कि राष्ट्रवादी?
एका वृत्त वाहिनेला मुलाखत देताना डॉ. सोमय्या यांनी ही माहिती दिली. सॊमवारी आपण याची पोलखोल करणार आहे. पण आधी शिवसेनेच्या मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढायचा की राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य पक्षाने मला दिले आहे. त्याप्रमाणे मी ठरवणार आहे की, कुणाच्या मंत्र्याच्या घोटाळ्याची पोलखोल करायची, असेही डॉ. सोमय्या म्हणाले.
काय आहेत हे घोटाळे?
शिवसेनेच्या मंत्र्यांचा घोटाळा हा १२० कोटींचा आहे, तर राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा घोटाळा हा १२७ कोटींचा आहे. यात शिवसेनेच्या मंत्र्याच्या घोटाळ्याचा ४ हजार पानांचा अहवाल तयार आहे. तसाच अहवाल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचाही अहवाल तयार आहे. हे दोन्ही घोटाळे मनी लॉन्डरिंगची प्रकरणे आहेत. सेनेच्या मंत्र्याने पश्चिम बंगाल येथे एका बनावट कंपनीत त्याने भ्रष्टाचाराचे पैसे ट्रान्सफर केले. तर राष्ट्रवादीच्या मंत्र्याने सत्तेचा दुरुपयोग करत त्यांनीही मनी लॉन्डरिंगद्वारे पैसे ट्रान्सफर केले आहेत. त्यांनी बंद केलेल्या कंपनीच्या नावाने बनावट बँक खाते बनवले होते. या दोन्ही मंत्र्यांचा त्यांचा त्यांचा ‘वाझे’ आहे, असेही डॉ. सोमय्या म्हणाले.
अमित शहांकडून प्रोत्साहन!
आपल्याला ठाकरे सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांची पोलखोल करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रोत्साहन आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. मला त्यांनी थांबवले नाही. उलट अमित शहा यांनी आपल्याला या कामासाठी झेड सुरक्षा पुरवून प्रोत्साहन दिले आहे, असेही डॉ. सोमय्या म्हणाले.
Join Our WhatsApp Community