‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मंगळवार १७ डिसेंबरला लोकसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपाकडून आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे. एनडीएच्या घटक पक्षांकडूनही या विधेयकाला (One Nation, One Election Bill) पाठिंबा मिळाला आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल (Arjun Meghwal) मंगळवारी दुपारी १२ वाजता हे विधेयक मांडण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या विरोधात काँग्रेस आघाडीकडून आंदोलानाची योजना आखली आहे. त्यामुळे संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. (One Nation, One Election)
हे विधेयक मांडले गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठविले जाऊ शकते. राज्यघटनेतील १२९व्या दुरुस्तीचे हे विधेयक कायदा मंत्री राम मेघवाल लोकसभेत मांडतील, अशी शक्यता आहे. विविध पक्षांच्या सदस्य संख्येनुसार संयुक्त समिती नेमली जाईल. समितीचे अध्यक्षपद भाजपाकडे असेल. याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ काेविंद (Former President Ram Nath Kovind) यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार हे विधेयक मांडले जात आहे. देशभर लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १२ डिसेंबर रोजी या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली होती.
(हेही वाचा – Maharashtra Weather News: मुंबईत गारठा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा)
‘वन नेशन, वन इलेक्शन’ कायदा झाला तर निवडणुका कशा होणार?
प्रस्तावित कायद्यानुसार, दोन टप्प्यांत त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार असून 100 दिवसांत दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे.
(हेही वाचा – Counterfeit Medicine: धक्कादायक! ठाण्यात बनावट औषधाचा साठा जप्त)
एक देश एक निवडणुकीचा काय फायदा होणार?
एक देश एक निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अनेकदा भाषणावेळी सांगितले होते. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतानाही मोदींनी एक देश एक निवडणुकीसंदर्भात भाष्य केले होते. हिवाळी अधिवेशनावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूरी देण्यात आली. मंगळवारी संसेद विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. एक देश एक निवडणुकाची दोन टप्प्यात अंमलबजावणी करण्याची तयारी असेल. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होतील. त्यानंतर तीन महिन्यात दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका होतील. एक देश एक निवडणुकीमुळे आयोगावरील खर्च कमी होणार आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community