One Nation One Election विधेयक लोकसभेत स्थगित; राज्यसभेत होणार दोन दिवस विशेष चर्चा

64

लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation One Election) विधेयक मांडले जाईल, असे बोलले जात असतांना सोमवार, १६ डिसेंबरच्या कार्यसूचीमध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संदर्भातील विधेयके समाविष्ट नाहीत. राज्यसभेत हिवाळी अधिवेशनाच्या १६ व्या दिवशी सोमवारी राज्यसभेत दोन दिवसीय विशेष चर्चेला सुरुवात होणार आहे. गृहमंत्री अमित शहा सभागृहात याची सुरुवात करू शकतात. विरोधी पक्षाकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे चर्चेला सुरुवात करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी चर्चेत भाग घेणार आहेत.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ संबंधित विधेयके लोकसभेत मांडण्याचे काम आर्थिक कामकाज पूर्ण होईपर्यंत सरकारने पुढे ढकलले आहे. याआधी संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या अंमलबजावणी संबंधित दोन्ही विधेयकांच्या प्रती गेल्या आठवड्यातच लोकसभा सदस्यांमध्ये वितरित करण्यात आल्या. (One Nation One Election)

(हेही वाचा- Mahakumbh : प्रयागराज येथे कुंभपर्वात भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘अँटी ड्रोन’ यंत्रणा तैनात)

सरकार लोकसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने पूरक अजेंडाद्वारे शेवटच्या क्षणी देखील अजेंडा जोडू शकते. सूचीबद्ध केलेल्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांची पहिली फेरी सभागृहाने मंजूर केल्यानंतर ही विधेयके सादर केले जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या सुधारित अजेंड्यात दोन्ही विधेयके सोमवारच्या अजेंड्यात समाविष्ट नाहीत. विशेष म्हणजे संसदेचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरला संपणार आहे. (One Nation One Election)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.