One Nation, One Election : एक देश, एक निवडणूक समितीची ‘या’ दिवशी होणार पहिली बैठक

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 'एक देश, एक निवडणूक' या धोरणाच्या पडताळणीसाठी समिती नेमण्यात आली आहे

111
One Nation, One Election : एक देश, एक निवडणूक समितीची 'या' दिवशी होणार पहिली बैठक
One Nation, One Election : एक देश, एक निवडणूक समितीची 'या' दिवशी होणार पहिली बैठक

एक देश, एक निवडणूक’ (One Nation, One Election) धोरणाच्या हालचालींना आता वेग आला आहे. कारण यासाठी नेमलेल्या समितीची पहिली बैठक निश्चित झाली आहे. या समितीची पहिली बैठक २३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडणार आहे, अशी माहिती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक देश, एक निवडणूक’ या धोरणाच्या पडताळणीसाठी समिती नेमण्यात आली आहे. वन नेशन, वन इलेक्शन समितीची अधिसूचना केंद्र सरकारनं जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे असतील. तसेच गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एन के सिंह, सुभाष सी कश्यप, हरीश साळवे, संजय कोठारी यांचाही या समितीत समावेश आहे.

(हेही वाचा : National OBC Federation : ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

समिती ‘वन नेशन, वन इलेक्शन’ अर्थात देशभरातील सर्व निवडणुका जसं लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समिती आदी निवडणुका एकाच वेळी घेता येणं शक्य आहे का? याचा अभ्यास आणि पडताळणी करणार आहे. यासाठी ही समिती देशातील सर्व राज्यांचा दौरा करुन याबाबत लोकजागृती तसेच लोकांचं म्हणणं ऐकून घेतील. तसेच विविध राजकीय पक्षांशी देखील ही समिती सल्लामसलत करणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.