One Nation One Election : कोविंद समितीची पहिली बैठक; कोण होते हजर, कोण गैरहजर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 'एक देश एक निवडणूक'ची शक्यता तपासण्यासाठी समिती नेमली आहे.

186

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षेखाली शनिवार, २३ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आलेल्या समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. बैठकीचा तपशील अद्याप पुढे आलेला नाही तरी यात एकाच वेळी निवडणूक घेण्याच्या मुद्यावर गंभीर चर्चा झाली असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘एक देश एक निवडणूक’ची शक्यता तपासण्यासाठी समिती नेमली आहे.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष सी कश्यप, माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अन्य नेते समितीचे सदस्य आहेत. आजच्या बैठकीला सर्व सदस्य हजर होते. दरम्यान, अमित शाह आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कोविंद यांच्यासोबत बैठक करून आजच्या बैठकीचा अजेंडा आधीच निश्चित केला होता.

(हेही वाचा – प्रज्ञान रोव्हर, विक्रम लँडर स्लिपमोड मध्येच; ISROचे प्रयत्न सुरूच)

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांही एकत्र घेता येईल काय? याचा अभ्यास काविंद समितीकडून केला जाणार आहे. निवडणुका कशाप्रकारे घेता येतील आणि त्याची कालमर्यादा कशी असेल याबाबत ही समिती सरकारला शिफारस करणार आहे. लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांना या समितीत सदस्य म्हणून घेण्यात आले होते. परंतु, त्यांनी या समितीत सहभागी होण्यास नकार दिला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.