देशभरात वन नेशन वन इलेक्शन, आणि समान नागरी कायदा लागू करण्याविषयी भाजापाने सूतोवाच केले होते, मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. वन नेशन वन इलेक्शन यावर माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली स्थापन समिती अहवाल दिला आहे. तर UCC वरील केवळ चर्चाच सुरु आहे. त्यामुळे तिसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकार या दोन गोष्टी कधी लागू करणार, यावर स्वतः PM Narendra Modi यांनी संकेत दिले आहेत.
दिवाळी हा अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्ताव, याचा उद्देश देशातील सर्व निवडणुका एकाच दिवशी किंवा विशिष्ट कालावधीत घेण्याचा आहे, लवकरच मंजूर होईल आणि प्रत्यक्षात येईल. या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती आणि या वर्षाच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तो मांडला जाईल, असेही मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
(हेही वाचा Amit Thackeray यांना अडचणीत आणण्याचा उबाठाचा डाव; निवडणूक आयोगाला दिले पत्र)
आम्ही आता ‘वन नेशन वन इलेक्शन’ या दिशेने काम करत आहोत, जे भारताची लोकशाही मजबूत करेल, भारतातील संसाधनांचा सर्वोत्तम वापर करेल आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाला नवी गती देईल. आज भारत ‘UCC’कडे वाटचाल करत आहे, जो एक धर्मनिरपेक्ष नागरी संहिता आहे. सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सुरक्षेला असलेले अनेक धोके दूर करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांच्या मालकांना आता माहित आहे की भारताला दुखावून काहीही फायदा होणार नाही, कारण भारत त्यांना सोडणार नाही, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community