Mumbai BJP अध्यक्ष पदासाठी ‘या’ नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

119
Mumbai BJP अध्यक्ष पदासाठी ‘या’ नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!
Mumbai BJP अध्यक्ष पदासाठी ‘या’ नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!
  • सुजित महामुलकर

राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांचे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षानंतर मुंबई भाजपाच्या अध्यक्षांचीही निवड करणे क्रमप्राप्त असेल. त्यामुळे मुंबई भाजपा (BJP) अध्यक्ष पदासाठी एक नाव जवळपास निश्चित झाले असून त्यावर शिकामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

अध्यक्ष झाले मंत्री

भाजपमध्ये (BJP) काही संघटनात्मक बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत. विद्यमान मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची वर्णी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात लागल्यानंतर आता दोन्ही पदांवर नव्या उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात येतील.

(हेही वाचा – Samajwadi Party मधील नेत्याच्या हॉटेलमध्ये पनीरऐवजी दिले मांस; संतप्त नागरिकांची पोलिसात धाव)

पालिका निवडणुका तोंडावर

आगामी काळात मुंबईसह राज्यभरातील अनेक महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार असून, त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अध्यक्षपदासाठी तरुण सर्वमान्य आणि राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्व असणे आवश्यक आहे.

अळवणी, साटम, भातखळकर की कोटक?

मुंबई अध्यक्ष पदासाठी काही दिवसांपूर्वी माजी आमदार सुनील राणे यांचे नाव चर्चेत होते मात्र सध्या ते मागे पडले असून आता अतुल भातखळकर, अमित साटम, पराग आळवणी (Parag Alavani) या आमदारांच्या नावाची चर्चा आहे. लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर काही काळ मनोज कोटक यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती पण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती, उत्तर भारतीय, अमराठी अध्यक्ष निवडीचा पर्याय पक्ष स्वीकारणार नाही, अशी शक्यता आहे.

(हेही वाचा – Arunish Chawla यांची महसूल सचिवपदी नियुक्ती; अर्थसंकल्पाच्या ५ आठवडे आधी प्रशासकीय फेरबदल)

तरुण अध्यक्ष

त्यामुळे मुंबई भाजपा (BJP) अध्यक्षपदासाठी आमदार अमित साटम (Ameet Satam) यांचे नाव जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येते. ४८ वर्षीय माजी नगरसेवक आणि सलग तीनवेळा विधानसभेवर निवडून गेलेले अमित साटम (Ameet Satam) यांना मुंबईची आणि विशेषतः महापालिका क्षेत्राची चांगली माहिती असून महापालिकेतील त्यांच्या अनुभवाचा निवडणुकीत पक्षाला उपयोगच होईल, अशी माहिती भाजपाच्या अंतर्गत सूत्रांकडून देण्यात आली. १२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रदेशाध्यक्षाची निवड झाल्यानंतर मुंबई अध्यक्ष निवडला जाईल, अशी शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.