वारंवार न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी तहकूब होत असल्यामुळे शिवडी न्यायालयाकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
संजय राऊत यांच्यावर मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात अब्रूनुकसनीची याचिका दाखल केली आहे. सोमय्या यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा निराधार आरोप करून बदनामी केल्याचा राऊतांवर आरोप करण्यात आला आहे.
हे प्रकरण शिवडी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू असून या याचिकेवर सुनावणीसाठी राऊत हे वारंवार गैरहजर राहत आहे.
बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार होती, राऊतांच्या वतीने वकिलांनी ते गैरहजर राहण्यासाठीचा अर्ज केला होता, न्यायालयाने तो फेटाळून लावत राऊतांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, तसेच याचिकेवरील पुढील सुनावणी १० एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
(हेही वाचा – बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी यांना जे जमले नाही ते सावंत बंधूंनी करून दाखवले; तानाजी सावंतांचा दावा)
Join Our WhatsApp Community