जुलै २५, २०२२ रोजी द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी आपल्या राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (२५ जुलै २०२३) आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण झाले. तंत्रज्ञानाच्या मदतीने गेल्या वर्षभरात, राष्ट्रपती भवन अधिकाधिक लोकांशी जोडल्याबद्दल मुर्मु यांनी समाधान व्यक्त केले. तंत्रज्ञान आणि अभिनव कल्पकतेच्या मदतीने, राष्ट्रपती भवनाचे अधिकारी ही प्रणाली अधिकाधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी पुढेही काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती पदाच्या कारकीर्दीचे एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित अनेक उपक्रमांमध्ये द्रौपदी मुर्मु सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रपती भवन परिसरात असलेल्या शिव मंदिराच्या पुनर्विकासाची पायाभरणी त्यांनी केली.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या राष्ट्रपती पदाची जबाबदारी स्वीकारून आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. “राष्ट्रपती मुर्मू यांना त्यांच्या वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा! सार्वजनिक सेवेसाठी त्यांचे अथक समर्पण आणि प्रगतीचे अथक प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहे. विविध कर्तृत्वातून त्यांच्या नेतृत्वाचा मूर्त प्रभाव दिसून येतो.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations to Rashtrapati Ji on her first year in office! Her tireless dedication to public service and relentless pursuit of progress are extremely motivating. Her various accomplishments reflect the tangible impact of her leadership. https://t.co/AefRDvVmJF
— Narendra Modi (@narendramodi) July 25, 2023
(हेही वाचा – तानसा धरण आणि विहार तलावही भरले, मुंबई महापालिकेची आता खरी कसोटी)
राष्ट्रपती भवन (President Draupadi Murmu) परिसरातील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयांच्या क्रीडांगणातील क्रिकेट पव्हेलियनच्या कामाचे भूमिपूजनही त्यांनी केले. राष्ट्रपती भवनाने इंटेल इंडिया कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेल्या – नवाचार या कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त गॅलरीचे त्यांनी उद्घाटन केले. या गॅलरीमध्ये विद्यार्थी आणि एआय प्रशिक्षकांनी तयार केलेले इमर्सिव म्हणजेच त्रिमिती इनोव्हेशन्स आणि देशात विकसित एआय सोल्यूशन्स प्रदर्शित केले आहेत. यात सहा संवादात्मक प्रदर्शने असून त्यातून राष्ट्रपती भवनाच्या भव्यतेचा अनुभव प्रेक्षकांना येतो. त्याशिवाय, एआय कौशल्याचा सर्वसामान्यांसाठी होणारा वापर प्रेक्षकांना प्रेरणा देणारा आहे.
राष्ट्रपती मुर्मु (President Draupadi Murmu) यांनी आज भारतीय राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवन यांच्या पुनर्विकसित संकेतस्थळाची सुरुवात केली. राष्ट्रपतींचे सचिव राजेश वर्मा, एनआयसीचे महासंचालक राजेश गेरा तसेच राष्ट्रपती भवन आणि एनआयसी मधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच्या गेल्या एक वर्षाच्या काळात झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींचे वर्णन करणारे ई-पुस्तक देखील त्यांनी जारी केले राष्ट्रपती भवन परिसरातील आयुष स्वास्थ्य केंद्राची माहिती देणाऱ्या ‘प्रीझर्व्हिंग हेल्थ, एम्ब्रेसिंग ट्रेडीशन्स’ नामक पुस्तकाची पहिली प्रत यावेळी राष्ट्रपती मुर्मु (President Draupadi Murmu) यांना देण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community