देशात कांदा निर्यातबंदी (Onion Issue) लागू झाल्यानंतर संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले. त्याला शेतकऱ्यांच्या विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. फडणवीस यांनी गोयल यांना निवेदन देऊन परिस्थितीची माहिती दिली आणि या प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढण्याची विनंतीही केली. तर दुसरीकडे विरोधकांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. याचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये देखील उमटतांना दिसले.
अशातच आता केंद्र सरकारने कांदा प्रश्न (Onion Issue) सोडवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्र सरकार आता तब्बल दोन लाख टन कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे देशांतर्गत घाऊक दर स्थिर राहतील. असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंचा विकासाला विरोधच असतो”)
ग्राहक व्यवहार खात्याचे सचिव रोहित कुमार सिंह म्हणाले की; “सरकारी खरेदी सुरू असल्याने कांद्याच्या निर्यातबंदीचा (Onion Issue) शेतकऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. या वर्षी आतापर्यंत आम्ही ५.१० लाख टन कांदा खरेदी केला असून जास्त काळ टिकणारा कांदा सुमारे दोन लाख टन अधिक खरेदी करणार आहे.
पुढे बोलताना रोहित कुमार सिंह म्हणाले की; ” व्यापाऱ्यांनी जर कांद्याची साठवणूक केली आणि भाव वाढवले तर केंद्र सरकार बफर स्टॉकच्या माध्यमातून कांदा केव्हाही बाजारात आणू शकतो.” (Onion Issue)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community