Onion Price : कांदा पुन्हा रडवणार

123
Onion Price : कांदा पुन्हा रडवणार

देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने आशिया खंडातील कांद्याची (Onion Price) अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव सह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ होत घाऊक बाजारात कांदा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर गेला आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने देशांतर्गत कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यात मूल्य डॉलर मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे कांद्याचे निर्यात मूल्य प्रति मेट्रिक टन 800 डॉलर झाले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणी सापडणार आहे.

अशातच दुसरीकडे मुंबई बाजार समिती (२७ ऑक्टोबर) शुक्रवार व रविवार (२९ ऑक्टोबर) दोन दिवस बंद असल्याचा परिणाम (Onion Price) कांदा पुरवठ्यावरही झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये दर ६० रुपयांवर पोहोचले आहेत. नवी मुंबईमध्ये किरकोळ मार्केटमध्ये कांदा ८० रुपयांवर पोहोचला असून, वाशी सेक्टर १७ मधील उच्चभ्रू वसाहतीमधील मार्केटमध्ये प्रतिकिलो १०० दराने कांद्याची विक्री होत आहे.

(हेही वाचा – Health Tips : ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनेक लोक आजारी का पडतात ?)

आज ठरणार पुढील दर

सीबीडी, नेरुळ, सानपाडा, कोपरखैरणे परिसरातील किरकोळ मार्केटमध्ये (Onion Price) कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात होता. वाशी सेक्टर १७ मधील भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याचे दर १०० रुपयांवर पोहोचले होते.

अशातच आज म्हणजेच सोमवार ३० ऑक्टोबर रोजी बाजार समितीमध्ये किती आवक (Onion Price) होणार यावर पुढील दर अवलंबून राहणार आहेत. पुरेशी आवक झाली नाही तर सर्वच किरकोळ मार्केटमध्ये कांदा शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.