गोव्यात ‘ऑपरेशन लोटस’ नंतर सुरू झाला #BikGayiCongress ट्विटर ट्रेंड

174
अनेक दिवसांपासून गोव्यात काँग्रेसला भगदाड पडणार आहे, अशी चर्चा होती, अखेर बुधवार, १४ सप्टेंबर रोजी भाजपाला मुहूर्त मिळाला. गोवा काँग्रेसचे ८ आमदारांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून हातात ‘कमळ’ घेतले. काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसचे केवळ ३ आमदार शिल्लक राहिले आहेत. काँग्रेसच्या या दयनीय स्थितीवर सोशल मीडियावर जोरदार टीका टिपण्णी सुरु झाली आहे. ट्विटर तर #BikGayiCongress हा ट्रेंड सुरु झाला आहे.

काय म्हटले आहे सोशल मीडियात?

तुफेल आप म्हणतात की, इतनी जल्दी तो हमारा सब्जी नही बिकता जितना जल्दी काँग्रेसके विधायक बिक रहे है, असे म्हणाले.

कारमान यांनी फेव्हिकॉल कंपनीच्या जाहिरातीचा आधार घेत, विशेष चित्रीकरण आहे, गोवा येथे ऑपरेशन लोटस होण्याआधी प्रदर्शित झाले नाही. भाजपा कसा काँग्रेसच्या आमदारांना पकडतो?, असे म्हटले.

मणिंदर कौर पाबला म्हणतात काँग्रेसची अवस्था म्हणजे इधर चला मै उधर चला

(हेही वाचा वेदांता-फॉक्सकॉनवरील वादावरुन मोदींचा शिंदेंना फोन, म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.