Shiv Sena UBT खासदारांमध्ये संताप!

78
Shiv Sena UBT खासदारांमध्ये संताप!
  • खास प्रतिनिधी 

शिवसेना उबाठामध्ये ‘ऑपरेशन टायगर’ने प्रचंड घबराट पसरली असून आपले खासदार दिल्लीतूनच परस्पर शिवसेनेत (शिंदे) जाऊ नये यासाठी शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी दिल्ली गाठल्याचे बोलले जात आहे.

पहिलीच दिल्ली भेट

राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सत्कार केला आणि शिवसेना उबाठामध्ये (Shiv Sena UBT) प्रचंड अस्वस्थता पसरली. त्यानंतर शिवसेना उबाठाकडून पवार यांना टार्गेट करण्यात आले. या सत्कार समारंभानंतर आदित्य ठाकरे यांची ही पहिलीच दिल्ली भेट आहे.

(हेही वाचा – Congress प्रदेशाध्यक्ष पदासाठी Rahul Gandhi यांचा चमचा?)

खासदारांमध्ये संताप

ठाकरे यांनी दाखवण्यापुरती राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मात्र त्यांचा मुख्य उद्देश आपल्या ९ खासदारांना नियंत्रणात ठेवण्याचा होता. गुरुवारी दुपारी या खासदारांची बैठक घेत त्यांना ठाकरे यांच्याकडून दम देण्यात आल्याचे समजते. यामुळे शिवसेना खासदारांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संपर्कात राहण्याचा सल्ला

शिवसेना उबाठाव्यतिरिक्त (Shiv Sena UBT) कोणत्याही पक्षाच्या स्नेहभोजनासाठी किंवा अन्य वैयक्तिक समारंभासाठी जायचे असल्यास पक्षाची पूर्व परवानगी घेऊन जाणे तसेच पक्ष कार्यालयाशी संपर्कात राहण्याचा सल्ला ठाकरे यांनी दिल्याचे कळते.

शिवसेना (शिंदे) पक्षात शिवसेना उबाठाकडून (Shiv Sena UBT) ‘इनकमिंग’ वाढत असल्याने उबाठाचे धाबे दणाणले आहेत. गुरुवारी १३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला तर आणखी काही नेते ‘उबाठा’ला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारी आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.