विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहे, येत्या ५-६ दिवसांत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. यात उबाठामध्ये (UBT) मात्र आयारामांची संख्या असणार आहे. ज्यामुळे पक्षातील खऱ्या कार्यकर्त्यांची संधी हुकणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाची संभाव्य 30 उमेदवारांची यादी समोर आली आहे. ठाकरेंच्या या यादीत आयारामांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या यादीत चौदा विद्यमान आमदारांव्यतिरिक्त अजून 16 नावे समोर येत आहेत. त्यापैकी 9 म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक आयारामांना संधी देण्यात आली. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची असणार आहे. या निवडणुकीचे निकाल हे ठाकरेंच्या शिवसेनेचे भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील बडे मोहरे टीपून ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
(हेही वाचा निवडणुकीआधी CM Eknath Shinde उमेदवारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार)
उबाठातील (UBT) संभाव्य आयाराम उमेदवार
- स्नेनल जगताप – महाड
– काँग्रेसमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 6 मे 2023 - अद्वय हिरे – मालेगाव बाह्य
– भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 27 जानेवारी 2023 - दीपेश म्हात्रे -डोंबिवली
– शिवसेना शिंदे गटातून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश 6 ऑक्टोबर 2024 - किशन तनवाणी – संभाजीनगर मध्य
– शिवसेनेतून भाजप पुन्हा शिवसेना असा प्रवास - राजू शिंदे – संभाजीनगर
– भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 7 जुलै 2024 - दिनेश परदेशी – वैजापूर
– भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 12 सप्टेंबर 2024 - सुरेश बनकर- सिल्लोड
– भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 18 ऑक्टोबर 2024 - राजन तेली – सावंतवाडी
– भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश -18 ऑक्टोबर 2024
Join Our WhatsApp Community