मराठी साहित्य संमेलन नव्हे, भुज ‘बळ’ संमेलन!

72

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून नाशकात सुरू होत आहे, खरे तर अवकाळी पाऊस पाडून निसर्गानेही या संमेलनाचा निषेध केला आहे. त्याला कारणही तसेच आहे. यावेळीचे संमेलन म्हटले, तर अधिक समृद्ध, उत्साही आणि भाषेच्या सृजनशीलतेसाठी महत्वाचे करता आले असते, कारण हे संमेलन ज्या नगरीत होत आहे, त्या नाशिकला अध्यात्मिक, पौराणिक, सांस्कृतिक आणि सशस्त्र स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे, पण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातील मंडळी संमेलनाच्या आयोजनाच्या खर्चापोटी भुजबळी विचारांणा बळी पडली आणि या सुवर्ण इतिहासाकडे पाठ फिरवून ते अखिल मराठी साहित्य संमेलनाला विद्रोही साहित्य संमेलन बनवून बसले आहेत. त्यामुळे यापुढे वेगळे विद्रोही साहित्य संमेलन भरवण्याची गरज उरली नाही. संस्कृती, इतिहास आणि परंपरेचा मराठी साहित्य संमेलनात बिनदिक्कतपणे खून होत राहणार आहे, ही कुप्रथा ९४ व्या संमेलनाने पाडली आहे, ज्यामुळे स्वा. सावरकर, दुर्गा भागवत, पु.ल. देशपांडे असे अनेक विभुतींचे पुण्यात्मे जे संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेले, ते दुःखी झाले असतील.

akhtar

नाशिकला लाभलेला अद्वितीय इतिहास

नाशिकला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. कारण या नगरीला प्रत्यक्ष रामायणाचा इतिहास आहे. तसेच भरतखंडात या ठिकाणाला कुंभनगरी म्हणून ओळखले जाते. त्र्यंबकेश्वरच्या निमित्ताने या ठिकाणी भगवान शिवाचे स्थान आहे, गोदाकाठावर देवता विराजमान आहेत आणि याच नगरीतून स्वातंत्र्य चळवळीचे अग्निकुंड स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रूपाने पेटले होते, असा सगळा अमूल्य ठेवा, इतिहास या संमेलनाला लाभला होता.

(हेही वाचा आदित्य ठाकरे तरी माहीम किल्ल्याला गतवैभव मिळवून देणार का?)

सरस्वती हद्दपार

असे असतानाही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यावेळी नेहमीप्रमाणे राजकारण्यांसमोर नांगी टाकली आणि आयोजक म्हणून मंत्री छगन भुजबळ यांच्या ‘हो’ ला ‘हो’ करत माना डोलवण्याच्या व्यतिरिक्त काही केले नाही. त्याचे परिणाम म्हणून यंदाच्या संमेलनातून ज्या सारस्वतांनी उभे आयुष्य सरस्वतीचे पूजन केले, त्यांनी संमेलनातून सरस्वतीचे पूजन करण्याच्या प्रथेला हद्दपार केले, तरी सगळे निमूटपणे गप्प आहेत, त्यामुळे हे संमेलन विद्रोही साहित्य संमेलन बनले आहे की काय, असे वाटू लागले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना दूर ठेवले

बहुजनांचे नेते म्हणून स्वतःची ओळख अधिक ठळक करण्यासाठी भुजबळांनी संमेलनाला आपल्या विचारांचे स्वरूप दिले आणि ते निमूटपणे सहन करण्यात आले. ज्या नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांती कार्याचा इतिहास आहे, त्यांचा सन्मान भुजबळांच्या दबावाखाली येवून नाकारण्यात आला, संमेलन नगरीला वीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी होत असतानाही ती नाकारण्यात आली, नाशिकच्या वैभवाचा उल्लेख असलेल्या संमेलनाच्या गीतातून सावरकरांचा उल्लेख काढून टाकण्यात आला.

हिंदू विरोधी जावेद अख्तरांना पायघड्या

या संमेलनाचे उद्घाटत म्हणून गीतकार जावेद अख्तर यांना निमंत्रित करण्यात आले होते, त्याला विरोध झाला होता, त्यावर आयोजकांनी अख्तर यांना प्रमुख पाहूणे म्हणून निमंत्रित केले, अख्तर हे कायम हिंदू धर्माच्या विरोधात बोलत असतात. त्यांचे मराठी साहित्यासाठी काहीही योगदान नाही, ५० वर्षे मुंबई, महाराष्ट्रात राहूनही त्यांना मराठी बोलता येत नाही, त्यामुळे त्यांना विरोध होऊनही त्यांना निमंत्रित करण्यात आले. अशा रीतीने अखिल भारतीय मराठी संमेलनाचे जे मुळ स्वरूप, संस्कृती होती, तिला नाशकात मुठमाती देण्यात आली आहे, याचा निषेध करावा तितका थोडाच आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.