सध्या हिवाळी अधिवेशन विविध आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. सुरुवातीचे २ दिवस विरोधक भारी पडत होते, पण त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आणि विरोधकांची कोंडी झाली. याचा दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले, हे थेट विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचे अपयश आहे, अशी चर्चा सुरु झाली. त्याचवेळी अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून जाणार अशीही चर्चा रंगू लागली. अशा वेळी शिंदे-भाजप सरकारचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवार जर राष्ट्रवादी सोडून शिंदे-भाजप सरकारमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, असं वक्तव्य केले.
काय म्हणाले दीपक केसरकर?
अजित पवार यांच्या सारखा उमेदा नेता जर आला तर कुणाला आवडणार नाही, त्यांची राष्ट्रवादीत घुसमट होत आहे, हे सर्वांनाच माहित आहे. ते राष्ट्रवादी सोडून शिंदे-भाजप यांच्यात सामील झाले तर त्यांचे स्वागतच आहे, असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
(हेही वाचा 2,50,000 नागरिकांना गिळंकृत करणारी ख्रिसमसनंतरची ‘ती’ काळरात्र)
अजित पवार संतापलेले
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे जेव्हा अधिवेशन काळापुरते निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा विरोध पक्षनेते अजित पवार यांनी त्यावर परिणामकारक विरोध केला नाही. त्यामुळे यावर अजित पवार यांच्या भूमिकेवर शंका घेण्यात येऊ लागली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार यांना फोनवरून विचारणा केल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. त्यावर माध्यमांनी जेव्हा विचारणा केली त्यावेळी अजित पवार संतापले आणि विरोधी पक्षाची जबाबदारी काय आहे, हे मला शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी माध्यमांवरच राग काढला होता.
Join Our WhatsApp Community