अशी बैठक म्हणजे निव्वळ टाईमपास, फडणवीसांचा सरकारवर निशाणा

117

भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी बहिष्कार टाकला. यामागचं कारण आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री गैरहजर असल्याने या चर्चेतून काहीच निष्पन्न होणार नव्हते. इतक्या महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहत नाहीत. तर ही बैठक म्हणजे निव्वळ टाईमपास आहे का, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

(हेही वाचाः अन् फडणवीसांनी एका दमात म्हणून दाखवली ‘हनुमान चालिसा’! पहा व्हिडिओ)

संवादापेक्षा संघर्षच केलेला बरा

या सरकारने संवादाला जागाच ठेवली नाही. कोणी जर हिटलरी वृत्तीने वागायचं ठरवलं असेल तर त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्षच केलेला बरा, अशी आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही बैठकीवर बहिष्कार घातला. विरोधी पक्षाला जीवानिशी संपवण्याची सरकारची प्रवृत्ती असेल आणि सरकारच्या पक्षांचे लोक पोलिसांच्या समक्ष आमच्या नेत्यांवर हल्ले करणार असतील आणि त्या संदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागणार असेल, तर अशा बैठकीत जाऊन फायदा काय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोणी हुकूमशाही पद्धतीने वागत असेल तर त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्षच केलेला बरा, असं रोखठोक मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

(हेही वाचाः समृद्धी महामार्गावर किती भरावा लागणार टोल? वाचा दर)

हनुमान चालिसा पाकिस्तानात म्हणायची का?

हनुमान चालिसा म्हणण्यासाठी इतका विरोध का, हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही म्हणायची तर काय पाकिस्तानात म्हणायची, असा थेट सवालही त्यांनी केला आहे. एका महिलेसाठी हजारो लोक जमा करता त्यांच्या घरी जाऊन पोलिस त्यांना अटक करतात आणि जणू काही पाकिस्तानचं युद्ध जिंकल्याप्रमाणे जल्लोष करण्यात येतो, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरुन नाही, असंही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचाः कारागृहात नवनीत राणा यांची प्रकृती खालावली; काय आहे कारण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.