हनुमान चालिसा पठणावरुन आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर राजद्रोहाचा खटल्या भरल्यानंतर, राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हनुमान चालिसा म्हणणं जर राजद्रोह असेल तर तो आम्ही राज करू, असं म्हणत फडणवीसांनी हनुमान चालिसेचे श्लोक म्हणून दाखवले.
…तर आम्ही रोज राजद्रोह करू
हनुमान चालिसा म्हटल्यामुळे राज्य उलथवलं म्हणणं यापेक्षा हास्यास्पद दुसरं काय असू शकतं. महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणणं जर राजद्रोह होत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आम्ही रोज राजद्रोह करू, आमच्यावरही राजद्रोहाचा खटला दाखल करा, असं म्हणत फडणवीसांनी हनुमान चालिसेतील सुरुवातीचे काही श्लोक म्हणून दाखवले. मी आता पूर्ण हनुमान चालिसाही म्हणून दाखवू शकतो, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
(हेही वाचाः फडणवीसांचं केंद्रीय गृहसचिवांना पत्र, काय आहे पत्रात?)
हनुमान चालिसा पाकिस्तानात म्हणायची का?
हनुमान चालिसा म्हणण्यासाठी इतका विरोध का, हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही म्हणायची तर काय पाकिस्तानात म्हणायची, असा थेट सवालही त्यांनी केला आहे. एका महिलेसाठी हजारो लोक जमा करता त्यांच्या घरी जाऊन पोलिस त्यांना अटक करतात आणि जणू काही पाकिस्तानचं युद्ध जिंकल्याप्रमाणे जल्लोष करण्यात येतो, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरुन नाही, असंही फडणवीस म्हणाले.
(हेही वाचाः समृद्धी महामार्गावर किती भरावा लागणार टोल? वाचा दर)
Join Our WhatsApp Community