वाघाचे फोटो काढून कुणी वाघ होत नसतं, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना चिमटा

77

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी झालेल्या आपल्या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर ते वाघ असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत होता. त्यालाच आता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. नुसते वाघाचे फोटो काढून कुणी वाघ होत नसतं त्यासाठी लढावं लागतं, अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

वाघ होण्यासाठी निधड्या छातीने लढावं लागतं

उद्धव ठाकरे यांच्या शनिवारच्या सभेनंतर त्यांना शिवसेनेकडून वाघ म्हणण्यात येत आहे. पण त्यांना समजावून सांगा नुसते वाघाचे फोटो काढले म्हणजे कोणी वाघ होत नाही. वाघ होण्यासाठी निधड्या छातीने लढावं लागतं. आजवर तुम्ही कुठला संघर्ष केला आहे. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे हे केवळ फेसबूक लाईव्ह करत होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

(हेही वाचाः तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणणार, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा)

धूर्त कोण असतं?

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की बाळासाहेब भोळे होते, मी धूर्त आहे. पण खरं तर वाघ हा भोळाच असतो, पण धूर्त कोण हे मी सांगणार नाही. कारण त्यांनी पातळी सोडली म्हणून मला ती सोडायची नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

देशात केवळ एकच वाघ

एक लक्षात ठेवा, बाळासाहेब ठाकरे हे वाघ होतेच पण आता देशात केवळ एकच वाघ आहे आणि त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे नरेंद्र मोदी आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः मास्टर कसली, ती तर लाफ्टर सभा! फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.