फडणवीस म्हणतात, पवारांच्या सल्ल्याची गरज…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्याकडून भाजपवर अनेकदा टीका करण्यात येते. केंद्र सरकार मुलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला आहे. पवारांच्या सल्ल्याची उद्धव ठाकरे यांना अधिक गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे लक्ष दिले तर अधिक बरे होईल. महाराष्ट्रातला गरीब, शेतकरी, आदिवासी, महिला यांच्यासमोर असलेल्या प्रश्नांचा विचार करुन त्यांनी राज्यातील सरकारला सल्ले दिले तर जास्त चांगले होईल. देशात नरेंद्र मोदी यांचे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. देशातील जनतेने त्यांच्यावर वारंवार विश्वास दाखवला आहे. त्यामुळे पवारांच्या अमूल्य सल्ल्याची आवश्यकता ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे त्यांनी तो त्यांना द्यावा, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

राज ठाकरेंनी अपेक्षा ठेवणे चुकीचे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे आवाहन केले आहे. तेव्हा राज ठाकरे यांनी सरकारकडून ही अपेक्षा करणे चुकीचे असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला आहे. हनुमान चालिसा म्हणायची घोषणा केल्यानंतर त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा आरोप करुन त्यांना जेलमध्ये ठेवतात, त्या सरकारकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. त्यामुळे या सरकार विरोधात आम्ही लढत आहोत, त्यांनीही लढले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here