आता सत्तेसाठी शिवसेना एमआयएम सोबत जाणार? फडणवीस म्हणतात…

तसंही शिवसेनेने आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारले आहे. त्यामुळे...

174

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिल्याने आता राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत राज्याच्या सत्तेत असल्याने आता या युतीबाबत शिवसेना काय करणार ते बघू, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच आता शिवसेनेने जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलंच आहे, त्यामुळे त्याचा आता काय परिणाम होतो, असा टोलाही यावेळी फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

(हेही वाचाः आता एमआयएम-राष्ट्रवादीची युती होणार?)

कोणीही एकत्र आलं तरी…

राष्ट्रवादीने जरुर एमआयएमसोबत जावं, कारण ते सगळे एकंच आहेत. देशात भाजपला हरवण्यासाठी सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणीही एकत्र आलं तरी देशातील आणि राज्यातील जनता ही मोदींच्या पाठीशी आहे. फक्त आता या सगळ्या युतीच्या समीकरणात शिवसेना काय करणार हे पहाणं आता गरजेचं असणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

त्यांनी हिंदुहृदयसम्राट ऐवजी जनाब स्विकारलंच आहे

शिवसेना आता सत्तेसाठी काय करते, तेच आम्हाला पहायचे आहे. तसंही शिवसेनेने आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारले आहे. त्यांच्याकडून अजानच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे, त्यामुळे त्याचा आता काय परिणाम होतो ते बघूया, असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला.

(हेही वाचाः आता ‘द गोवा फाईल्स’ चित्रपटाची मागणी! कोणी आणि कसे केले होते हिंदूंवर अत्याचार?)

हरल्यानंतर त्यांना हे सगळं दिसतं

एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप अनेकदा करण्यात येतो.हरल्यानंतर त्यांना ईव्हीएम मशिन, बी, सी, झेड टीम दिसत असतात. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

एमआयएमची ऑफर

एमआयएमचे खासदार जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीत देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या, अशी ऑफर आपण टोपे यांना दिल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. शिवसेनेची कायमंच एमआयएमच्या विरोधात भूमिका राहिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएमची ही ऑफर स्विकारली तर शिवसेना यावर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचाः शरद पवार म्हणाले, आता थांबा; अधिवेशनानंतर बघू!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.