गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणा दाम्पत्याची अटक, भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला यामुळे भाजपने आता ठाकरे सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सोमय्यांवरील हल्ल्याचा निषेध केला असून, राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे.
काय आहे पत्रात?
- राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांची विचारपूस करायला गेलेल्या किरीट सोमय्यांवर हल्ला करण्यात आला.
- खास पोलिसांच्या सुरक्षेतच शिवसैनिकांनी सोमय्यांवर हल्ला केला.
- सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या, चप्पल आणि दगडफेक करण्यात आली.
- या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यात ते जखमी झाले.
- पोलिस स्टेशनसमोर अशाप्रकारे झालेला हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे.
- राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
(हेही वाचाः …तर केंद्रीय गृहखात्याची टीम महाराष्ट्रात पाठवू, गृहसचिवांचे सोमय्यांना आश्वासन)
हे झुंडशाहीचे सरकार
शनिवारी मुंबईत घडलेली घटना ही मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. झेड सिक्युरिटीमधील व्यक्ती तिथे येतात, ते सांगतात की बाहेर 70 ते 80 गुंड आहेत. तरीही पोलिसांच्या उपस्थितीतच झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीवर हल्ला होतो. एकतर पोलिसांचे या हल्ल्याला समर्थन होते किंवा ते इतके नाकाम झाले आहेत की, त्यांना दबावामुळे काहीच करता येत नाही हे सिद्ध होते. पोलिसांसमोर दगड मारले जाणार असतील, तर मग अशाप्रकारचे झुंडशाही सरकार मी पाहिलेले नाही, असेही फडणवीस रविवारी म्हणाले.
(हेही वाचाः आता पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचणं होणार बंद, पश्चिम आणि मध्य रेल्वेचा ‘हा’ आहे प्लॅन)
Join Our WhatsApp Community