विरोधी पक्ष जमिनीवर आला! संजय राऊतांचा टोला 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यामुळे सत्ता गेली, म्हणून अस्वस्थ वाटत असेल, तर ते स्वाभाविक आहे. त्यांना पुढील ३ वर्षे टीकाच करायची आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे २ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना भेटले, त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मंगळवारी ते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले, हे चांगले आहे. यावरून विरोधी पक्ष आता जमिनीवर आला आहे, असे दिसते, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला हाणला,

उद्या मातोश्रीवरही यावेत! 

राजकारणात कुणीही कुणाचे शत्रू नसतात आणि नसावे. ही राजकीय संस्कृती नाही. मतभेद असू शकतात पण ते टोकाचे नसावेत. सध्या निवडणुकाही नाहीत, मग इतकी घालमेल कशाकरता? निवडणुका येतील तेव्हा ठरवू, विरोध करू. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हे समजले आहे, हे चांगले आहे. उद्या त्यांनी मातोश्रीवरही यावे. विरोधी पक्षाने राज्याच्या समस्या जाणून घ्यायच्या असतात, जनतेशी संवाद साधायचा असतो, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा : खासगी रुग्णालये बंद करतायेत कोविड कक्ष!)

पुढील ३ वर्षे त्यांना टीकाच करायची आहे! 

लोकशाहीत सर्वांना टीका करण्याचा अधिकार असतो. आम्ही विरोधी पक्षनेत्यांची टीका स्वीकारतो. लोकशाही असल्याने आम्ही हे मानतो. लोकशाहीनेच आम्हाला जनाधार दिला, तो आम्ही स्वीकराला. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यामुळे सत्ता गेली, म्हणून अस्वस्थ वाटत असेल, तर ते स्वाभाविक आहे. त्यांना पुढील ३ वर्षे टीकाच करायची आहे, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here