Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या पहिल्याच पुणे दौऱ्यात नाराजीनाट्य

191

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांची नुकतीच विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. या निवडीनंतर प्रथमच त्यांनी पुणे शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना पुणे शहरातील काँग्रेसमधील गटबाजीचा अनुभव आला. पुणे काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे यानिमित्ताने समोर आले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात नाराजी असल्याचे समोर आले. त्यांच्या या दौऱ्यात नाराजीनाट्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

कसा घडला नाराजीनाट्याचा प्रकार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुणे दौऱ्यावर होते. ते पुण्यात येताच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले. विजय वडेट्टीवार पुणे काँग्रेस कार्यालयात जाणार होते. परंतु त्यांनी अचानक आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाण्याचे ठरले. त्यानंतर त्यांच्या गाडीत असलेले शहराध्यक्ष अरविंद शिंदे नाराज झाले. ते विजय वडेट्टीवार यांच्या गाडीतून उतरले अन् थेट काँग्रेस कार्यालयात आले. त्यामुळे वडेट्टीवार यांच्यासमोर धंगेकर गट आणि शहराध्यक्ष शिंदे गटातील गटबाजी समोर आली. या घटनेमुळे पुणे कॉंग्रेसमधील धूसफूस पाहायला मिळाली आहे.

(हेही वाचा Amrut Bharat station scheme : महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट?)

सत्ता सर्वोच्च मानणाऱ्यांना जनता बुडवते

अजित पवार यांनी अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना घेरले. अजितदादा यांना पाच वर्षांपूर्वी अमित शाह महाराष्ट्राचे जावई होते, हे माहीत नव्हते का? आता अजित पवार यांना हा जावई शोध कसा लागला. अजित पवार सत्तेला सर्वोच्च मानतात. परंतु सत्तेला सर्वोच्च मानणाऱ्या नेत्यांना जनता बुडवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका देखील वड्डेटीवार यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.