शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर बांगलादेशात (Bangladesh) अराजकता आणि हिंदूविरोधी हिंसाचार पसरला आहे. अशा स्थितीत भारतातही असाच ‘विद्रोह’ निर्माण होईल, अशी गलिच्छ अपेक्षा भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. यात काँग्रेसच्या नेत्यांची आघाडी आहे. काही काँग्रेस नेत्यांनी बांगलादेशातील परिस्थितीची तुलना भारतात सुरू असलेल्या कथित मोदीविरोधी ‘अंडरकरंट’शी करायला सुरुवात केली आहे. बांगलादेशात आंदोलकांनी शेख हसीना यांच्या निवासस्थानावावर हल्ला करून लुटालूट केली, तशीच लुटालूट भारतातही करण्याचे स्वप्न विरोधक पाहत आहेत.
7 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, पाकिस्तानच्या समर्थनार्थ बोलण्यात कुप्रसिद्ध असलेले मणिशंकर अय्यर यांनी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील (Bangladesh) परिस्थितीची भारताशी तुलना केली. निवडणुकीदरम्यान विरोधकांनी केलेली ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपांचा पुनरुच्चार करत अय्यर यांनी भारतातील निवडणुका कोणत्याही प्रकारे निष्पक्ष स्वरूपात झाल्या नाहीत. भारताची बांगलादेशासारखी परिस्थिती नाही. इथे विरोधक मुक्तपणे निवडणुकीत भाग घेतात, पण काही शंका निर्माण झाल्या आहेत, त्याबाबत काही गटांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील सुमारे ७९ जागांच्या निकालात फरक असल्याचा दावा त्यांनी केला. म्हणून ज्याप्रमाणे बांगलादेशातील लोकांच्या मनात तेथील निवडणूक निकालांबाबत शंका निर्माण झाल्या, त्याचप्रमाणे अनेक भारतीयांनाही २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शंका निर्माण झाला आहे. लोकांमध्ये अशी शंका कुशंका वाढू लागल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशाप्रमाणे भारतातही तशी परिस्थिती निर्माण होईल.
(हेही वाचा Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड विधेयकावर Shiv Sena पक्षाची भूमिका स्पष्ट, खा. श्रीकांत शिंदे म्हणाले…)
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले की, भारतातही बांगलादेशाप्रमाणे (Bangladesh) परिस्थिती निर्माण होणार आहे.
काँग्रेस नेते केवळ मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्ला करण्यासाठीच नव्हे तर बांगलादेशसारख्या भारतात अराजकता वाढवण्यासाठी बिनबुडाचे दावे करत आहे. काँग्रेस नेते सज्जन वर्मा म्हणाले की, तो दिवस दूर नाही जेव्हा लोक शेख हसीनाप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला करतील. प्रथम श्रीलंकेत, लोकांनी त्यांच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रवेश केला, नंतर बांगलादेशात (Bangladesh) आणि आता भारताचा क्रमांक लागतो.
Join Our WhatsApp Community