Maharashtra Assembly Session :  विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

172

महाविकास आघाडीच्या नेत्यांची पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, ठाकरे गट, शेकाप, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांनी बैठक घेऊन घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर स्वारस्य नसल्याचे कळवले आहे. अर्थात आम्ही चहापानावर आम्ही बहिष्कार घातलेला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विक्रम घडला

शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली. मागच्या अधिवेशनात कांद्याला ३५० रुपये जाहीर केले होते. परंतु, शेतकऱ्याला एक रुपयाचंही अनुदान मिळालेलं नाही. शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात आले आहेत. कापसाचा दर १२ हजार होता तो ६ हजार रुपायंवर आला. चांगला भाव मिळेल या आशेने अनेक शतेकऱ्यांनी कापसाचा साठा करून ठेवला आहे. अतिवृष्टी आणि सततचा पावसासाठी सरकारने निधी जाहीर केला होता, तो निधीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. सततच्या पावसामुळे एनडीआरएफच्या दुप्पटीने मदत करणार अशी घोषणा सरकारने केली होती. परंतु, अद्याप एकटीनेही निधी, पैसा, अनुदान मिळालेलं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विक्रम घडतोय की काय एवढ्या आत्महत्या झाल्या आहेत. साडे बाराशेच्यावर आत्महत्या घडल्या आहेत. मुख्यमत्र्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणं ही माझी प्राथमिकता असेल. परंतु, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रतही आत्महत्या झाल्या आहेत. कोकणताही चार आत्महत्या झाल्या आहेत. प्राथमिक अपेक्षा पूर्ण करण्यातच सरकार अपयशी ठरलं आहे. शेतकऱ्यांच्या विरोधातील हे सरकार आहे”, असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी केला.

(हेही वाचा Ajit Pawar : अजित पवारांच्या गटाने शरद पवारांची घेतली भेट; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?)

कायदा सुव्यवस्था धाब्यावर

“राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक खून घडले आहेत. माता भगिनींवर अत्याचार झाले आहेत. हॉस्टेलवर बलात्कार करून तरुणीचा खून झाला. मीरा रोडमध्ये सहाने नावाच्या इसमाने महिलेची हत्या केली, पुण्यातील राजगड येथे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणीची हत्या झाली, एका तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला. नागपूरला मी मागच्या आठवड्यात गेलो होतो, तेव्हा मला कळलं की तिथे गावठी कट्टे विकण्याचं सर्वांत जास्त प्रमाण नागपूरमध्ये आहे. सरकार पुरस्कृत जातीय दंगली घडल्या आहेत. या दंगली सरकारने घडवल्या आहेत की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहेत. सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. महसूल मंत्र्यांनी मित्तल टॉवरमध्ये बसून बदल्या होतात, असे विविध आरोप अंबादास दानवे यांनी केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.