विरोधक मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कसे खोटे नरेटिव्ह सेट करतात, त्याचा पर्दाफाश मी सोमवार, 29 जुलै रोजी करणार आहे, असा इशारा भाजपाचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मनोज जरांगे त्यांनी इतरांवर राजकीय बोलण्यापेक्षा मूळ प्रश्नांना बगल द्यायला सुरुवात केली आहे. या आंदोलनात कशा पद्धतीने फेक नरेटिव्ह सेट केले जातात, वक्तव्य केली जातात. या संदर्भातील पर्दाफाश मी उद्या करणारच आहे. महाराष्ट्रात सरकार आंदोलकांच्या भूमिकेशी सकारात्मक आहे. पण ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्या, या मागणीसोबत कुणीही राजकीय पक्ष सहमत नाही. जरांगेंनी ज्या मागण्या केल्यात त्याबाबत सर्व विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले.
(हेही वाचा ‘प्रतापगडा’ प्रमाणे विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी दादर येथे Hindu Janajagruti Samiti ची मूकनिदर्शने)
शरद पवार बोलत आहेत की, ओबीसींसाठी काम करणारे लक्ष्मण हाके आणि मराठा नेते मनोज जरांगे यांना घेऊन बैठक करावी. अशा बैठकीसाठी कुणीही विरोध करत नाही. जरांगे बोलतात, आम्ही बैठकीत येऊन काय करणार? एका व्यासपीठावर सर्वांनी येण्याची गरज आहे. यामुळे महाराष्ट्रासमोर स्पष्ट भूमिका येईल. शरद पवारांनी या बैठकीत उपस्थित राहून भूमिका मांडावी, असा आग्रह आहे. निवडणूक पाहून भूमिका घ्यायची नाही, असे चालणार नाही, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. आमदारासारख्या महत्वाच्या लोकप्रतिनिधी, नेत्यानेही आपण महायुती म्हणून सामोरे जाणार असू तर महायुतीत वितुष्ट येईल, अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत. खो-खो सारखं खेळ खेळू नये. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मेळाव्यात सांगितले होते की, कुणाला खुमखूमी आली तर पक्ष प्रमुखांशी बोला. कुणीही अशा प्रकारे महायुतीत वाद होईल आणि ज्याचा आपल्या वाटचालीवर, निवडणुकीवर परिणाम होईल असे वक्तव्य करू नये, असे खडेबोलही प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सुनावले.
Join Our WhatsApp Community